आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम:29 शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा आता जवळील शाळेत प्रवेश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या दरम्यान शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यात २९ मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यामध्ये २९ बालके स्थलांतरित होऊन शहरात आली आहे तर ९ बालके शहराबाहेर गेल्याचे आढळून आले आहे. या बालकांना आता जवळच्या शाळेत प्रवेश दिले जाणार आहे.

गरिबी अन् आर्थिक परिस्थितीने हतबल झालेली कुटुंब रोजगाराच्या शोधार्थ नियमित स्थलांतरित होत असल्याने आता शाळाबाह्य मुलांना शोधण्याच्या उपक्रमांत तीच अधिक आढळून येत असली तरीही संख्या मात्र अल्पच दिसून येत आहे. कोरोना नंतर तर अधिकच परिश्रम घ्यावे लागत आहे. कारण या कालावधीत रोजगार आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहाच्या दृष्टीने मोठे स्थलांतर झाल्याचा पाहण्यात आले आहे. त्यासाठी शासनस्तरावर नाशिकमध्ये शाळाबाह्य मुलांना शोधले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...