आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरण:लासलगावी कांद्याला 2952 रुपये भाव; 150 रुपयांची घसरण

लासलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव बाजार समितीत मंगळवारी (१ नोव्हेंबर) उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त २९५२ रुपये भाव मिळाला. सोमवारच्या तुलनेत दरात सुमारे दीडशे रुपयांची घसरण झाली. सोमवारी ३ हजार १०० रुपये भाव होता. मात्र सरासरी दर हे २४५० रुपये प्रतिक्विंटल कायम राहिले आहेत.

मंगळवारी ७८३ वाहनांतून ११ हजार २७४ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. किमान भाव ८०० रुपये होता. यंदा लाल कांदा बाजारपेठेत उशिराने दाखल होणार असल्याने उन्हाळ कांदा चांगला भाव देईल या प्रतीक्षेत बळीराजा असून गेल्या सहा-सात महिन्यांपासून चाळीत साठवलेला कांदा सध्या शेतकरी बाजारपेठेत थोड्याफार प्रमाणात विक्रीसाठी आणत आहेत.

मनमाडला सरासरी २४०० भाव मनमाड । येथील बाजार समितीत मंगळवारी (१ नोव्हेंबर) २१३ ट्रॅक्टरमधून कांदा आवक झाली. पहिल्या दर्जाच्या उन्हाळ कांद्याला १६०० ते २७९१ तर सरासरी २४०० रुपये क्विंटल भाव मिळाला. सोमवारच्या तुलनेत क्विंटलमागे भाव शंभर रुपयांनी कमी झाले. मक्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत शंभर रुपयांची घसरण झाली. २०३ ट्रॅक्टर्स आवक होऊन १८५१ ते २०७३ तर सरासरी १९०० रुपये क्विंटल असे मक्याचे भाव होते. दुसऱ्या दर्जाच्या कांद्याला १२०० ते २३०० तर सरासरी २००० रुपये क्विंटल भाव होते. सोमवारी कांद्याला सरासरी २०२० रुपये क्विंटल भाव होते. परतीच्या पावसाने खरीप हातातून गेलेल्या शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याकडून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...