आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जा प्रणाली:पालिकेला 2 वर्षांत 3 काेटींचा फायदा ; तुलना केल्याने मनपाची आर्थिक बचत

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र व राज्य शासनाच्या धाेरणानुसार नाशिक महापालिकेने शहरात नेहमीच साैरऊर्जेला प्राधान्य देत गेल्या तीन वर्षांपासून मनपाच्या इमारतींवर रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यात आली असून महावितरणाच्या वीज देयकाबरोबर तुलना केल्याने मनपाची आर्थिक बचत हाेऊन सुमारे तीन काेटी २५ लाखांचा फायदा झाला आहे.

राजीव गांधी भवन, पंचवटी विभागीय कार्यालय, जिजामाता हॉस्पिटल या तीन ठिकाणी सोलर सिस्टिम कार्यान्वित आहे. सिडको विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, स्मार्ट सिटी, फाळके स्मारक, महात्मा फुले कला दालन येथील इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात आली. सप्टेंबर २०१९ ते जून २०२२ या कालावधी एकूण ११,६८,३२२ युनिट्सची निर्मिती झाली. त्याचा दर ४.५९ रुपये आहे. महावितरणचा दर ११ रुपये प्रति युनिट आहे. म्हणजेच प्रत्येक युनिटमागे ६.४१ रुपयांची बचत होते. एकूण युनिट्सचा विचार करता मनपाची ७४ लाख ८८ हजाराची बचत झाली आहे.

मनपाने सार्वजनिक खासगी भागीदारीवर २५ वर्षांचा करार केला आहे. त्यानंतर हा प्रकल्प मनपाकडे हस्तांतरित होईल. भविष्यात मनपाचा विल्होळी आणि सातपूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच नाशिकरोड येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातही सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

एलईडी दिव्यांसाठी पीपीपी तत्वावर सात वर्षांचा करार सौरऊर्जा प्रकल्पाबरोबरच एलईडी पथदिव्यांमधूनही बचत झाली आहे. टीपी ल्युमिनेअर कंपनीने (टाटा) हे दिवे बसविले असून त्याची देखभाल दुरुस्ती कंपनीकडूनच केली जाते. पीपीपी तत्त्वावर सात वर्षांचा करार कंपनीबरोबर केला आहे.

शहर साैंदर्यीकरणातही भर मनपानेे सहाही विभागात ९९ हजार दिवे लावले आहेत. या प्रोजेक्टमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली असून रात्री नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम उपक्रमांतर्गतही तीन प्रकल्पांमध्ये सौरऊर्जेचा वापर होणार आहे. मनपाची ११३ शौचालये सौरऊर्जेने उजळणार आहेत. कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गंत हे प्रकल्प असणार आहेत. - उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता

बातम्या आणखी आहेत...