आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरातील दुचाकींची जळगावात विक्री करणारे 3 सराईत अटकेत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी कंपनीत काम करून शहर व परिसरात दुचाकी चोरी करून जळगाव येथे विक्री करणाऱ्या ३ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. अॅन्टी मोटारसायकल थेफ्ट परिमंडळ २ च्या पथकाने ही कारवाई केली. तीन महिन्यांत पथकाने १५ दुचाकी चोरांना अटक केली आहे.अंबड परिसरात एक संशयित दुचाकी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. संशयित अतुल नाना पाटील रा. भडगाव, यास ताब्यात घेतले.

चौकशीत पवन रमेश पाटील, पाचोरा, ऋतिक उत्तम अडसुळे रा. नाशिकरोड यांच्या मदतीने शहरातून २९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांकडून ७ लाख ७० हजारांच्या २९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. नाशिकरोड आणि दुचाकी चोरी प्रतिबंधक पथकाचे विशाल पाटील, मनोहर शिंदे, विनोद लखन, स्वप्निल जुंद्रे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित शहरातून महागड्या दुचाकी चोरी करून जळगाव ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अवघ्या ५ ते १० हजार रुपयांना विक्री करत होते. कागदपत्र आणून देतो असे सांगत मिळेल तेवढी रक्कम घेत संशयित पसार होत होते.

बातम्या आणखी आहेत...