आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 3 Lakhs In Sidko; Blockade Of Shinde Group By Chief Minister, 28 Thousand Houses Are Free Held, Only Half Of Them, But Only CIDCO Office Is Blocked.

सिडकाेतील ३ लाख लाेक वाऱ्यावर:मुख्यमंत्र्यांकडून शिंदे गटाचीच नाकेबंदी, 28 हजार घरे फ्री हाेल्ड न करता सिडकाेचे कार्यालयच बंद करण्याचा घाट

प्रतिनिधी । नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील २८ हजार घरे फ्री होल्ड अर्थातच रहिवाशांच्या नावावर करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत बैठकांचा धडाका लावला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने त्याबाबत दिलासा देण्याचे सोडून थेट सिडकोचे कार्यालयच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटच तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. यानिमित्ताने सिडकोतील ३ लाख लोकांना पुन्हा वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त होत असून हा मुद्दा राजकीय पटलावर तप्त झाला आहे.

नाशिक शहरात सिडकोला प्रचंड महत्व असून कष्टकरी व अर्थिक दुर्बल घटकांचा समावेश या भागात आहेत. याठिकाणी अत्यंत दाटीवाटीने वसाहती असून त्यात एकाच घरात मोठे कुटूंबही अडचण सहन करून राहत आहे. घरमालकी सिडकोची असल्यामुळे त्यांना परवानगीसाठी आहे त्या नाशकातील कार्यालयातच ये-जा करण्यात अनेक यत्न येतात.

अशातच पालकमंत्री झाल्यानंतर भुसे यांनी सिडकोतील २८ हजार घरे फ्री होल्ड करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. याबाबत दोनदा बैठकीत आढावाही घेतला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार असल्याचे जाहीरही झाले. प्रत्यक्षात हा निर्णय होण्यापुर्वीच सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याबाबत नगरविकास खात्याचेच पत्र आल्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली.

यानिर्णयानंतर राजकीय वातावरण तप्त झाले असून कार्यालय बंद झाल्यास सुमारे तीन लाख सिडकोवासीयांची अडचण होवू शकते. तोंडावर आलेल्या पालिका निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो हे लक्षात आल्यानंतर शिंदे गट अर्थातच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवून निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तिदमे हे स्वत: सिडकोतीलच रहीवासी असून त्यांचीही राजकीय अडचण झाली आहे.

अशी आहे सिडकोची स्थिती

महानगपालिका क्षेत्रात सिडकोने नवीन नाशिक येथे 6 गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंदाजे २५ हजार सदनिका बांधल्या असून अंदाजे ५ हजार वेगवेगळया वापरांचे भूखंड वाटप केले आहेत. तसेच वेगवेगळया ठिकाणी अंदाजे १५०० टपरी भूखंडे देखील वाटप केलेली आहेत. विशेष म्हणजे ५ हजार भूखंडांमधील निवासी, तथा व्यापारी आणि वाणिज्य भूखंडांवर बांधलेल्या अपार्टमेंट/ सोसायटी मधील फ्लॅट /रोहाऊस /कार्यालय /ऑफिस /शॉप या वेगळया असून त्यांची संख्या गृहीत धरली तर किमान ५० हजार मिळकती असण्याची शक्यता आहे.

ही कामे होणार कोठून ?

सिडकोतील मिळकतींचे हस्तांतरण करण्यासाठी ना हरकत पत्र देवून हस्तांतरीत व्यक्तिची अभिलेखामध्ये नोंद घेणे, बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रासाठी महापालिकेला ना हरकत पत्र देणे, लिज डिड नोंदणीसाठी दस्त, मिळकतधारकाचे निधन झाल्यानंतर वारसांची नोंद अभिलेखामध्ये घेणे, कर्जासाठी ना हरकत दाखला देणे, भूखंडांच्या मुळ वापरात बदल करणे जसे की निवासीवरून अनिवासी तथा व्यापारी करणे, कागदपत्रे गहाळ झाल्यास सत्यप्रती देणे, सिडकोच्या भूखंडांवर बांधलेल्या अपार्टमेंट, सोसायटीमधील मिळकतधारकांची नोंदणी करणे आदी कामे होणार कोठून असेही प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...