आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अश्लील सिडी विक्री करणाऱ्या आरोपीला 3 महिने सश्रम कारावास

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातगाड्यावर अश्लिल सीडी विक्री करणाऱ्या आरोपीला ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठाेठावली आहे. गुरुवारी (दि. ८) अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एम. एम. गादीया यांनी ही शिक्षा सुनावली. सोमनाथ विश्वनाथ कोळपकर (४२, रा. जुनी तांबट लेन) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०११ रोजी शालीमार चौक येथे आरोपी हातगाड्यावर या अश्लील सीडी विनापरवाना विक्री करतांना आढळून आला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालिन कर्मचारी आर. ई. सैय्यद यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी, पंच साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरुन ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली. सरकार पक्षातर्फे अॅड. एस. आर. सपकाळे यांनी कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...