आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचे पोलिसांनाच आव्हान:महाराष्ट्र पोलिस अकादमीची सुरक्षा भेदून 3 चंदनाची झाडे नेली कापून, 3 महिन्यांत दुसरी घटना

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पोलिस अकादमीची सुरक्षा भेदून अकादमीच्या आवारातील तीन चंदनाचे झाडांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. विशेष म्हणजे 3 महिन्यांपुर्वीच अकादमीमधून 2 झाडांची चोरी करण्यात आली होते. या गुन्ह्याचा अद्याप उलगडा झालेला नसताना आणखी 3 झाडे चोरी झाल्याने चंदन चोरट्याने थेट पोलिस यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस कर्मचारी नागनाथ काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील कॅडेट मेसच्या पश्चिम बाजुस विहिरीजवळ असलेले 3 चंदनाच्या झाडांचे खोड बुंध्यापासून कापून नेण्यात आले. परिसरात गस्त करत असताना हा प्रकार लक्षात आला. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

शासकीय बंगले लक्ष

चंदन चोरांनी शहरातील न्यायाधीश निवास स्थान, पोलिस अधीक्षकांचे निवास स्थान, महाराष्ट्र पोलिस अकादमी, मिलिटरी परिसरातील चंदनाचे झाडे चोरी केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच खासगी बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडांचीही चोरी करण्यात आली आहे.

टोळी सक्रिय

चंदन चोरी करणारी सराईत चोरांची टोळी शहरात सक्रीय आहे. पुणे रोडवर पळसेच्या पुढे शहराच्या बाहेर पाल ठोकून राहणाऱ्या काही कुटुंबांची तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी केली होती. यामध्ये दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दोघांकडून चंदन हस्तगत करण्यात आले होते.

पोलिसांच्या गस्तीचा अभाव

अकादमीला चारही बाजुने सुरक्षा भिंती आहेत. सुमारे ४०० प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षक आणि शंभरच्या वर कर्मचारी येथे कार्यरत आहे. तरीदेखील चंदन चोरांनी अकादमीमध्ये प्रवेश करत चंदनाचे झाडे चोरी केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...