आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक मुट्ठी अनाज उपक्रम:अनाथ चिमुकल्यांसाठी 3 टन‎ धान्य, 2 लाखांचे अर्थसहाय्य‎

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सु-संस्कृती फाउंडेशनद्वारा आयोजित‎ म्युझिकल चॅरिटी शाेच्या माध्यमातून‎ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अनाथ मुले तसेच‎ एचआयव्हीग्रस्त मुलांना ३ टन धान्य तसेच २‎ लाखाचे अर्थसहाय्य करण्यात आले.‎ गायक किशाेरकुमार यांना समर्पित विविध‎ गाण्यांचे सादरीकरण अन् ‘एक मुठ्ठी अनाज’‎ हा उपक्रम या शाेमध्ये आयाेजिला हाेता. त्यात‎ येताना प्रत्येकाने आपल्यापरीने धान्य घेऊन‎ यावे, असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास‎ उदंड प्रतिसाद लाभला. बाबा आमटे प्रेरित व‎ दत्ता बारगजे संचलित एचआयव्ही पीडित‎ अनाथ चिमुकले तसेच आत्महत्याग्रस्त‎ शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ करणारी संस्था‎ स्नेहवनसाठी मदतीचा हात देण्यात आला.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक‎ धनंजय जैन यांनी केले. अशोक आचार्य यांनी‎ आभार मानले. कार्यक्रमास रसिक श्राेत्यांची‎ माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती. त्यांनी यापुढेही‎ मदतीची तयारी दर्शविली.‎

प्रमाेद देव यांनी गायली‎ तब्बल ३५ गाणी‎
संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद देव यांनी‎ किशोरकुमारची ३५ गाणी गाऊन‎ रेकॉर्ड ब्रेक केला. डुएट गाण्यात‎ श्रेयसी राय व मेघा मुसळे यांनी साथ‎ दिली. प्रमुख पाहुणे महावीर‎ इंटरनॅशनलचे चेअरमन अनिल‎ नहार, राजेंद्र बाफणा, ग्रुपचे सचिव‎ राजेंद्र कुमट आदी उपस्थित हाेते.‎

पहिला समाजगााैरव पुरस्कार‎ डाॅ. भूषण सुरजुसे यांना‎
फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यात विशेष‎ योगदान देणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देण्याची‎ घोषणा करण्यात आली होती. पहिला‎ पुरस्कार गेली २० वर्षे एचआयव्हीसारख्या‎ दुर्धर आजाराने ग्रस्त अशा लोकांवर प्रसंगी‎ नि:शुल्क किंवा अत्यंत नाममात्र शुल्क घेऊन‎ सेवा प्रदान करीत असलेल्या डाॅ. भूषण‎ सुरजुसे यांना देण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...