आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन वर्षांत सहाशे काेटींपेक्षा अधिक खर्च करून तयार केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचे बघून आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला जाब विचारला आहे. त्यानंतर शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी तीन वर्षांच्या आत दायित्व (डिफेक्ट लायबिलिटी) असलेल्या १४ नवीन रस्त्यांशी संबंधित ठेकेदारांना खड्डे कसे पडले याबाबत नाेटिसीद्वारे विचारणा केली आहे. नवीन रस्त्यांवर खड्डे बुजण्यासह नव्याने डांबराचे अस्तरीकरण करण्याचेही आदेश दिले आहे.
महापालिकेत गेल्या काही वर्षांत ठेकेदार, अधिकारी व काही वजनदार नगरसेवकांनी युती केली असून त्यांनी रस्त्यांची कामे थेट भागीदारी तत्त्वावर घेण्याचा गाेरखधंदा सुरू केला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम हाेत असून गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे अधिकारी लाेकप्रतिनिधींच्या संबंधांमुळे दबून रहात आहेत. दुसरीकडे, नियमानुसार रस्त्यांवर ५० एमएम इतका डांबरांचा थर देणे अपेक्षित असताना जेमतेम ३० एमएमचा थर दिला जात असल्यामुळे गुणवत्ता कशी राहणार असा प्रश्न आहे. जुन्या रस्त्यांवर साेडा, मात्र जे रस्ते तीन वर्षांपूर्वीच केले आहे व नियमानुसार त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित ठेकेदाराकडेच आहेे, त्यावर खड्डे पडल्यामुळे बांधकाम विभाग चक्रावला आहे. काही रस्त्यांवर तर थेट डांबराचे थरच वाहून गेल्यामुळे आयुक्त पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दारांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.
आयुक्त पवार यांची नाशिककरांना आठवण
मुंबई महापालिकेत थेट तळापर्यंत जाऊन काम करण्याचा असलेल्या अनुभवाचा वापर करून माजी आयुक्त रमेश पवार यांनी चांगला पायंडा पाडला हाेता. अधिकाऱ्यांमध्येही त्यामुळे जरब हाेती. खड्डे पडल्यानंतर त्यांनी स्वत: पाहणी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांना तंबी दिली हाेती. तसेच ठेकेदारांवर कठाेर कारवाई सुरू केली असतानाच त्यांची बदली झाली. त्यामुळे आता, नाशिककरांना पवार यांनी फील्ड पॅटर्नची आठवण हाेत आहे. दुसरीकडे, पालिकेच्या कामकाजाची गती मंदावल्यामुळे नाराजीचा सूर आहे.
डिपाॅझिट जप्त करणार
तीन वर्षांच्या आतच रस्त्याना खड्डे पडले तर दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असते. अशा १४ ठेकेदारांना नोटीस देण्यात आली आहे.रस्त्याची डागडुजी केली नाही तर, संबंधितांचे डिपॉझिट हाेणार आहे.
- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.