आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइल लुटणाऱ्या आराेपीला 3 वर्षे सश्रम कारावास

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयात न्याय मिळण्यास अनेक वर्षे लागतात. मात्र यास अपवाद ठरला आहे. लुटमारीच्या गुन्ह्याचा तीन महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या खटल्यात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुनील लाशा डगळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अभियोग कक्षाने दिलेल्या माहिती अशी, पंचवटी पोलिस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२२ रोजी लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी हिरालाल कोल (रा. अौरंगाबादरोड) हे दुपारी ४ वाजता म्हसोबा पटांगण येथे उभे असताना एका अनोळखी इसमाने पत्ता विचारण्याचा बहाणा करत हुज्जत घालून कोल यांचे दोन्ही हात पकडून खिशातून बळजबरीने मोबाइल लुटून नेला होता.

पंचवटी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचवटी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरिक्षक प्रवीण देवरे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी सुनील डगळे (रा. गौरी पटांगण) याला अटक केली होती. त्याच्या ताब्यातून दोन मोबाइल हस्तगत केले होते. पाेलिस उपनिरीक्षक देवरे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करून तत्काळ आराेपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल देताना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा ए. पाटील यांनी साक्षीदार व सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यास सरकार पक्षातर्फे जी. आर. बोरसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी व्ही. ए. नागरे, पी. पी. गोसावी यांनी या प्रकरणात पाठपुरावा केला.

गुन्ह्या तत्काळ उघडकीस
पंचवटी पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली होती. गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आठ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादी, पंच, साक्षीदार यांची साक्ष झाल्यानंतर न्यायालयात खटला वेगाने चालवला गेला. आरोपीला शिक्षा ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...