आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेल्टा व्हेरियंट:नाशिक जिल्ह्यात जुलैत 30 डेल्टा रुग्ण; सौम्य लक्षणे, उपचारांती बरे

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना जिल्ह्यात ३० जणांना जुलैतच डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा धाेकादायक ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट नाही, तर साैम्य लक्षणे असलेला ‘डेल्टा’ आहे. हे सर्वजण उपचारांनंतर बरेही झाले. दाेन रुग्ण नाशिक शहर तर २८ जण ग्रामीण भागातील आहेत.

आयसीएमआरची संलग्न संस्था असलेल्या एनआयव्हीने या ३० रुग्णांच्या चाचण्यांचे अहवाल पाठवले आहेत. ते साैम्य लक्षणे असलेल्या ‘डेल्टा’ व्हेरियंटचे असून धाेकादायक ‘डेल्टा प्लस’चे नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. भारतातील अनेक शहरांमध्येही डेल्टा व्हेरियंंट आढळून आला आहे. नाशिक जिल्ह्यात डेल्टाचे ३० रुग्ण आढळून आल्याचे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांचे १५० रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ३० रुग्णांना डेल्टा व्हेरियंटची लक्षणे आहेत.

नागरिकांनीही अधिक काळजी घ्यावी
आयसीएमआरची संलग्न संस्था असलेल्या एनआयव्हीने पाठवलेल्या अहवालानुसार हे रुग्ण साैम्य लक्षणे असलेल्या डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गाचे आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर याेग्य उपचार केले जात आहेत. सर्व निकषांनुसार याेग्य काळजीही घेतली जात आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

बातम्या आणखी आहेत...