आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पक्षांचा विरोध:घरपट्टी थकबाकीदारांच्या 30 मालमत्ता करणार जप्त

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरपट्टीची थकबाकी वसूल व्हावी यासाठी महापालिकेने सुरू केलेली ढोल बजाओ मोहीम काही राजकीय पक्षांच्या विरोधामुळे बंद करण्याची वेळ आली असून आता पालिका पूर्वीप्रमाणे पहिल्या टप्प्यात ३० मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव करून थकबाकी वसूल करणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून पालिकेचे उत्पन्न घटले आहे. घरपट्टीची थकबाकी ३०० कोटींपुढे आहे. पहिल्या टप्प्यात एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १२५८ थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करून १७ ऑक्टोबरपासून थकबाकीदारांचे घर, दुकान, कार्यालयांसमोर ढोल वाजवून थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली.

त्यात तब्बल ७३ लाखांची थकबाकी वसूल झाली. त्यानंतर सुरुवातीच्या पाच दविसांत मनपाच्या तिजोरीत सुमारे चार कोटी २५ लाख रुपयांचा कर जमा झाला. मध्यंतरी दविाळीमुळे पालिकेने या मोहिमेला काही दविस ब्रेक लागल्यानंतर १ नोव्हेंबरपासून ढोल बजाओ मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु, त्यास प्रतिसादच मिळाला नाही. १७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत सहाही विभागांतील ६९२ थकबाकीदारांच्या घरांसमोर, दुकाने तसेच कार्यालयांसमोर ढोल वाजवून सुमारे ५ कोटी ३४ लाखांची वसुली करण्यात आली. त्यानंतर ४ व १० नोव्हेंबर या दोन दविसांत पश्चिम विभागात मोहीम राबवून २८ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली.

मात्र त्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याएेवजी आता मनपा थकबाकीदार मालमत्तांना जप्ती वॉरंट बजावून थकबाकी भरण्यासाठी २१ दविसांचा कालावधी देणार आहे. यानंतरही थकबाकी न भरल्यास संबंधित मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतही कोणी सहभागी न झाल्यास महापालिका १ रुपया भरून संबंधित मालमत्ता स्वत:च्या नावे करण्याची प्रक्रिया करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...