आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसुमाग्रज स्मारकात राज्यभरातून आले शास्त्रीय गायक:घराण्यांच्या रागदारीचे 30 गायकांचे स्वर

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रात:काळी गायला जाणाऱ्या राग मिया मल्हारने वातावरणांत प्रसन्नतेचा गंध फुलवला तर दिवसाचा तिसरा प्रहर भीमपलासचे स्वर सुगंधीत करताे. त्यानंतर राग जाेग तल्लीनतेची शांतता देताे. अशा शास्त्रीय रागदारीमध्ये रसिक हरवून गेले हाेते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या शास्त्रीय संगीतावर आधारीत या अनाेख्या स्पर्धेत विविध राग आळवले गेले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून 30 शास्त्रीय गायक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध गायक पं. प्रसाद खापर्डे आणि जेष्ठ संवादिनी वादक संगीतकार पं. सुभाष दसककर यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे, अॅड. दत्तप्रसाद निकम. कार्यवाह मकरंद हिंगणे उपस्थित होते. कलावंतांना साथसंगत नितीन पवार, नितीन वारे, रसिक कुलकर्णी (तबला) तर संवादिनी वर सागर कुलकर्णी, हर्षद वडजे यांनी संगत केली.

रागदारीत हरवले रसिक

पहिल्या दिवशी १२ कलाकारांनी शास्त्रीय सूर आळवले. यात स्वराली जोगळेकर यांनी राग भीमपलासने स्पर्धेला अर्थात मैफलीला सुरूवात केली आणि रसिक भारावून गेले. त्यानंतर अभयसिंह वाघचौरे यांनी सर्व रागांचा राजा मानल्या जाणाऱ्या मालकंस राग आळवायला सुरुवात केली. रात्री बारा ते ३ या वेळेत हा राग गायला जाताे. त्यावेळची निरव शांतता, वातावरणातील गंध या रागातून रसिकांना मिळाला. तर मारवा थाटातून उत्पत्ती झाल्याचे मानला गेलेला पुरीया धनश्री हा राग मुक्ता मिसर आणि चिन्मय वैद्य यांनी यांनी सादर केला. बागेश्री क्षीरसागर यांनी राग मधुवंती, स्वरदा जोशी यांनी राग जोग, नेत्रा बिवलकर यांनी राग मिया मल्हार), गीतांजली हराळ यांनी राग यमन, आम्रपाली तांबे यांनी मालकंस), सोजी जॉर्ज राग सारंग, अभिजित राजगुरू राग बागेश्री आणि नंदिनी आहिरे (पुरिया धनाश्री) यांचा समावेश होता.

उद्या पुढील फेरी

आज, रविवारी (दि. 11) सकाळी 10.30 वा. पुढील फेरी हाेणार असून 18 कलाकार गायन करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...