आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शटर फोडून दुकानात ठेवलेले ३१ मोबाइल लंपास:सिडकाेत दुकान फोडून ३१ मोबाइल लंपास

सिडकाे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजीवनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका मोबाइलच्या दुकानाचे शटर फोडून दुकानात ठेवलेले ३१ मोबाइल लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज इंद्रदेव निषाद (३६, रा. खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) यांच्या संजीवनगर येथील दुकानाचे शटर तोडून दुकानात ठेवलेले सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे ३१ विविध कंपन्यांचे मोबाइल लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एकापाठाेपाठ एक घडणाऱ्या घरफाेडीच्या घटनांनी पाेलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...