आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ४ सदस्यीय प्रभाग:जुन्याच रचनेनुसार पुन्हा एकदा ३१ प्रभागांची चिन्हे; अनिश्चितता कायम

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक महापालिकेच्या ४४ प्रभागांसाठी तयार केलेली त्रिसदस्यीय प्रभागरचना रद्द झाल्यामुळे आता २०१७ नुसार चार सदस्यीय प्रभागरचना अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबत काेणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. २०११ मधील जनगणेनुसार १४ लाख ८३ हजार हाच लाेकसंख्येचा आधार मानल्यास जुनीच प्रभागरचना काही अपवादात्मक बदल करून कायम राहील असा निवडणूक अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. नाशिक शहराची लाेकसंख्या १४ लाखांपुढे असल्यामुळे १२ ते २४ लाख या स्लॅबमध्ये महापालिका आली असून त्यामुळे १२ लाखांपर्यंतच्या लाेकसंख्येचा हिशेब करून किमान ११५ व उर्वरित दाेन लाख ८३ हजार लाेकसंख्येचा विचार करून ४० हजार लाेकसंख्येमागे एक अतिरिक्त सदस्य या पद्धतीने ७ असे ११५ व ७ यांची बेरीज मिळून २०१७ प्रमाणेच १२२ नगरसेवकांची संख्या असेल असे समजते.

ओबीसी, महिला आरक्षण चक्रानुसार, एससी, एसटी उतरत्या क्रमानेच : जुनीच प्रभागरचना कायम राहिली तर, सलग दुसरी निवडणूक असल्यामुळे आेबीसी व सर्वसाधारण प्रवर्ग किंबहुना दाेन्ही प्रवर्गातील महिलांचे आरक्षण नव्याने काढावे लागेल. प्रभागनिहाय वाढीव मतदारांची पुन्हा विभागणी केली जाणार असून त्यासाठी मे २०२२ मधील अंतिम मतदार यादीचा आधार घेतला जाईल. अनुसूचित जाती व जमाती या दाेन्ही प्रवर्गाचे आरक्षण मात्र लाेकसंख्येच्या उतरत्या क्रमानेच हाेईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

निवडणूक कधी होणार साशंकता कायम.
नव्या निर्णयानुसार आता पुन्हा आरक्षण साेडत, मतदार याद्यांची सुधारणा नव्याने करावी लागेल काय, याची स्पष्टता नाही. मात्र तसे झाल्यास दिवाळीनंतरच निवडणुका हाेतील असा अंदाज आहे. दरम्यान या न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच न्यायालयाने पावसाळ्यानंतर लगेचच निवडणुका घेण्यास सांगितल्याने एकदा निवडणूक कार्यक्रम घाेषित झाल्यानुसार निर्णय झाला तर सर्व प्रक्रिया झटपट करून आॅक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान हाेऊ शकेल

बातम्या आणखी आहेत...