आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या ३८ व्या तुकडीचे ३२ वैमानिक गुरुवारी (दि. १) देशसेवेत दाखल झाले. लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी, महानिर्देशक व कर्नल कमांडंट आर्मी यांच्या हस्ते हेलिकॉप्टर प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले, उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी यांना विशेष ट्रॉफी देऊ गौरविण्यात आले.
वैमानिक प्रशिक्षकांच्या ३७ व्या तुकडीतील सात प्रशिक्षकसुद्धा कॅट्समधून घडले. त्यांचा दीक्षांत सोहळा यावेळी बोचऱ्या थंडीच्या वातावरण आणि देशभक्तीपर गीतांच्या लष्करी बॅण्ड पथकाच्या सुरात करण्यात आला. नाशिकच्या गांधीनगर येथील कॉम्बॅट एव्हीएटर्स कोर्स येथे १८ आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण, २२ आठवड्यांचे हेलिकॉप्टर वैमानिक प्रशिक्षक आणि २३ आठवड्यांचे प्राथमिक रिमोट उड्डाण एअरक्राफ्ट सिस्टिमचे (इंटर्नल पायलट आणि ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या एकूण ५७ अधिकाऱ्यांनी संचलन करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
यावेळी अजय कुमार सुरी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह ५७ अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. कॅट्सचे कमांडन्ट ब्रि. जय वढेरा, उपकमांडन्ट कर्नल डी. के. चौधरी उपस्थित होते. यावर्षी प्रथमच प्रशिक्षणार्थींच्या तुकडीत चार महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये तीन महिलांनी ड्रोन उड्डाणाचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
यावर्षी एक नायजेरियन सैनिकाचाही वैमानिकांच्या तुकडीत समावेश आहे. वैमानिक तुकडीतील प्रशिक्षणार्थी कॅ. नमन बन्सल यांना अष्टपैलू कामगिरीसाठी 'सिल्व्हर चित्ता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मेजर अभिमन्यू गनाचारी यांना मेजर प्रदीप अग्रवाल स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. मेजर नवनीत जोशी आणि लेफ्टनंट कर्नल पुनीत नागर यांना अनुक्रमे ब्रिगेडियर के. व्ही. शांडील व एस. एम. स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
असे आहेत ट्रॉफी विजेते !
कॅप्टन राहुल मलिक (फ्लेजिंग ट्रॉफी), कॅ. चिट्टी बाबू आर (पी.के.गौर मेमोरियल ट्रॉफी), कॅ. नमन बन्सल (सिल्व्हर चित्ता व एअर ऑब्झर्वेशन ट्रॉफी), कॅ. जयेश सक्सेना (एस.के.शर्मा मेमोरियल ट्रॉफी), मेजर अमित सिंह (फस्ट ग्राऊंड सब्जेक्ट), मेजर अभिमन्यू गनाचारी (मे.प्रदीप अग्रवाल मेमोरियल ट्रॉफी), गनर विवेक (विशेष प्रावीण्य)
प्रशिक्षणार्थी महिला अधिकारी
कॅप्टन सुजाता आर्या, कॅप्टन मलिका नेगी, कॅप्टन गौरी महाडिक, कॅप्टन अनुमेहा या महिला अधिकारी यांनी देखील एव्हिएशन प्रशिक्षण पूर्ण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.