आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैमानिक देशसेवेत दाखल:32 लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक देशसेवेत

नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या ३८ व्या तुकडीचे ३२ वैमानिक हे गुरुवारी (ता.१) देशसेवेत दाखल झाले. यावेळी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सूरी, महानिर्देशक व कर्नल कमांडंट आर्मी यांच्या हस्ते हेलिकॉप्टर प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले, तसेच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी यांना विशेष ट्रॉफी देऊ गौरवण्यात आले. यावेळी वैमानिक प्रशिक्षकांच्या ३७ व्या तुकडीतील सात प्रशिक्षकसुद्धा कॅट्समधून घडले. नाशिक येथील गांधीनगर येथील कॉम्बॅट एव्हीएटर्स कोर्स येथे १८ आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण, २२ आठवड्यांचे हेलिकॉप्टर वैमानिक प्रशिक्षक आणि २३ आठवड्यांचे प्राथमिक रिमोट उड्डाण एअरक्राफ्ट सिस्टमचे (इंटर्नल पायलट व ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या एकूण ५७ अधिकाऱ्यांनी दिमाखदार संचलन केले. यावेळी अजय कुमार सूरी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह ५७ अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.

असे आहेत ट्रॉफी विजेते कॅप्टन राहुल मलिक (फ्लेजिंग ट्रॉफी), कॅ. चिट्टी बाबू आर (पी.के.गौर मेमोरियल ट्रॉफी), कॅ. नमन बन्सल (सिल्वर चित्ता व एअर ऑब्झर्वेशन ट्रॉफी), कॅ. जयेश सक्सेना (एस.के.शर्मा मेमोरियल ट्रॉफी), मेजर अमित सिंह (फस्ट ग्राऊंड सब्जेक्ट), मेजर अभिमन्यू गनाचारी (मे.प्रदीप अग्रवाल मेमोरियल ट्रॉफी), गनर विवेक (विशेष प्राविण्य), प्रशिक्षणार्थी महिला - कॅप्टन सुजाता आर्या, कॅप्टन मलिका नेगी, कॅप्टन गौरी महाडीक.

बातम्या आणखी आहेत...