आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद!:नाशिकच्या 'कॅट्स'मधून 32 लढाऊ हेलिकॉप्टर पायलट देशसेवेत, उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी यांचा ट्रॉफी देऊन गौरव

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या 38वी तुकडीचे 32 वैमानिक हे गुरुवारी (दि.1) देशसेवेत दाखल झाले. यावेळी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सूरी, महानिर्देशक व कर्नल कमांडंट आर्मी यांच्या हस्ते हेलिकॉप्टर प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले, उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी यांना विशेष ट्रॉफी देऊ गौरविण्यात आले.

यावेळी वैमानिक प्रशिक्षकांच्या 37 व्या तुकडीतील सात प्रशिक्षकसुद्धा कॅट्समधून घडले. त्यांचा दीक्षांत सोहळा यावेळी बोचऱ्या थंडीच्या वातावरण आणि देशभक्तीपर गीतांच्या लष्करी बॅण्ड पथकाच्या सुरात करण्यात आला.

57 अधिकाऱ्यांना स्मृतिचिन्ह

नाशिक येथील गांधीनगर येथील कॉम्बॅट एव्हीएटर्स कोर्स येथे अठरा आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण, 22 आठवड्यांचे हेलिकॉप्टर वैमानिक प्रशिक्षक , आणि 23 आठवड्यांचे प्राथमिक रिमोट उड्डाण एअरक्राफ्ट सिस्टमचे (इंटर्नल पायलट आणि ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या एकूण 57 अधिकाऱ्यांनी दिमाखदार संचलन करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी अजय कुमार सूरी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह 57 अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.

18 अधिकाऱ्यांना विंग प्रदान

यावेळी कॅट्स चे कमांडन्ट ब्रिगेडियर संजय वढेरा, उप कामांडन्ट कर्नल डी.के. चौधरी हे उपस्थित होते. यावर्षीच्या पदवीदान सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांच्या तुकडीत चार महिला आधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये तीन महिलांनी ड्रोन उड्डाणाचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. यावर्षी एक नायजेरियन सैनिकाचाही प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीत समावेश आहे. त्यांनादेखील वैमानिका अभ्यास भारतीय प्रशिक्षणार्थ्यांसोबत मिळाला. सात एव्हीएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर आणि बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीमचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 18 अधिकाऱ्यांना विंग प्रदान करण्यात आले. अशा एकूण 57 आधिकाऱ्यांचा गौरव केला गेला. वैमानिकांच्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी कॅप्टन नमन बन्सल यांना अष्टपैलू कामगिरीसाठी 'सिल्वर चित्ता' देऊन गौरविण्यात आले. तसेच मेजर अभिमन्यू गनाचारी यांना मेजर प्रदीप अग्रवाल स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. मेजर नवनीत जोशी आणि लेफ्टनंट कर्नल पुनीत नागर यांना अनुक्रमे ब्रिगेडियर के.वी शांडील व एस.एम स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मानव विहरित ड्रोन ठरले विशेष आकर्षण

प्रशिक्षण स्थळावर यंदा चिता चिता या सोबतच मानव विरहित ड्रोन ठेवण्यात आले होते. हे ड्रोन प्रकाशात आणि अंधारातही उंचावरून अचूक छायाचित्र आणि चित्रकरण टिपू शकते.

असे आहेत ट्रॉफी विजेते

कॅप्टन राहुल मलिक (फ्लेजिंग ट्रॉफी), कॅ. चिट्टी बाबू आर (पी.के.गौर मेमोरियल ट्रॉफी), कॅ. नमन बन्सल (सिल्वर चित्ता व एअर ऑब्झर्वेशन ट्रॉफी), कॅ. जयेश सक्सेना (एस.के.शर्मा मेमोरियल ट्रॉफी), मेजर अमित सिंह (फस्ट ग्राऊंड सब्जेक्ट), मेजर अभिमन्यु गनाचारी (मे.प्रदीप अग्रवाल मेमोरियल ट्रॉफी), गनर विवेक (विशेष प्राविण्य)

बातम्या आणखी आहेत...