आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातचलाखी’:341 उद्यान देखभालीत ‘हातचलाखी’; 45 उद्यानांशी संबंधित ठेकेदारांना नोटिसा ; उपायुक्त मुंडे यांचा दणका अचानक केली तपासणी

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ५२४ उद्यानांची देखभाल दुरुस्ती करणे दिवसागणिक महापालिकेला अवघड जात आहे. त्यामुळे यापैकी अर्धा एकरपेक्षा मोठ्या ३४१ उद्यानांची देखभाल ठेकेदाराकडे दिल्यानंतर त्यांच्याकडून स्वच्छतेत हातचलाखी होत असल्याचे बघून उद्यान विभागाचे नवीन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी अचानक तपासणी सुरू केली आहे. यात ४५ उद्यानांच्या देखभालीत त्रुटी आढळल्याने त्यांना नोटिसा दिल्या. तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी खासगीकरणातून उद्यान देखभालीचा निर्णय घेतला. लहान उद्यानांसाठी १० हजार तर मोठ्या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी २० हजार रुपये इतका प्रतिमाह खर्चाचा हिशेब करून निविदा तयार केली गेली. उद्यान देखभाल दुरुस्तीत कुचराई केल्यास नागरिकांना एनएमसी इ-कनेक्ट या अॅपवर तक्रारी करण्याचे आवाहन केले गेले. मात्र कालांतराने या प्रक्रियेकडे उद्यान विभागाने दुर्लक्ष केले. मध्यंतरी, उद्यान देखभाल-दुरुस्तीची शहानिशा न करताच देयके अदा केली जात असल्याचा आरोप सभागृहनेते कमलेश बोडके यांनी करत या ठेक्याची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. मात्र, पुढे लोकप्रतिनिधींची पालिकेतील राजवट संपुष्टात आल्याने चौकशी होऊ शकली नाही. ही बाब लक्षात घेत आता नवीन उपआयुक्त मुंडेंनी देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या ३४१ उद्यानांची नेमकी स्थिती काय याचा अहवाल उद्यान निरीक्षकांकडून मागवला आहे. त्यासाठी प्रत्यक्ष स्थळपाहणीचे आदेश दिले असून यात त्रुटी आढळतील त्या अनुषंगाने ठेकेदारांना नोटीस दिली जाईल.

गाजरगवताच्या नावाखाली ‘लॉन्स’ची बिले सर्वसाधारणपणे पाच रुपये प्रति चौरस मीटर याप्रमाणे देखभालीसाठी उद्याने दिली गेली आहे. शहरात सर्वसाधारणपणे अर्धा ते दोन एकर यादरम्यान बहुतांशी उद्याने आहेत. थोडक्यात एक एकर उद्यानाची जागा असल्यास ४ हजार चौरस मीटर गुणिले ५ याप्रमाणे दरमहा २० हजार रुपये ठेकेदाराला मिळतात. ठेकेदाराकडून सहा ते सात हजार रुपये महिना याप्रमाणे स्थानिक गरजूला उद्यान स्वच्छतेचे काम दिले जाते. यात बऱ्याच उद्यानांमध्ये लॉन्सच्या नावाखाली गाजरगवताची देखभाल दाखवून महापालिकेकडून रक्कम उकळली जात असल्याचाही स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...