आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तणाव, प्रेमभंगातून 11 महिन्यांत 343 आत्महत्या

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर मानसिक तणाव वाढला होता. काेराेनाचे सर्व निर्बंध दूर झाल्याने माेकळेपणाने जीवन जगता येऊ लागले आहे. मात्र यामधील बहुतांशी तरुण विविध मानसिक तणावाखाली आहेत. प्रेमभंग, व्यसनाधीनता आणि मानसिक तणावातून जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ अखेर ३४३ आत्महत्यांचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण १४ ते ३० वयोगटांतील आहे.

आत्महत्येची खूप कारणे असू शकतात. जेनेटिक कारण आहे. ठराविक प्रकारची जनुके एखाद्याच्या शरीरात असतील तर आत्महत्या करण्याची प्रवृत्ती जास्त असते. मेंदूत काही ठराविक न्युरो ट्रान्समीटर्स किंवा तत्सम काही घटकांचे प्रमाण कमी असेल तरीही आत्महत्येचा धोका जास्त असतो. काही प्रमाणामध्ये अनुवंशिकता असते. व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म, संकटांमध्ये वागण्याची एक नैसर्गिक पद्धत, घरातील सदस्य, मित्रपरिवाराचा आधार हेदेखील यास कारणीभूत ठरत असतात.

मानसिक आजार असेल तर आत्महत्येचा धोका वाढतो. डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनियासारख्या आजारांमध्ये आत्महत्येचे प्रयत्न जास्त प्रमाणात दिसून येते. योग्य उपचार न झाल्यास अनेक व्यक्तींना आत्महत्येने जीवदेखील गमवावा लागतो.

मात्र दोन वर्षांच्या कालावधीत तरुणांमध्ये प्रेमभंग, व्यसनाधीनता, करिअरची चिंता आदी कारणांतून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीला मानसिक आजाराची लक्षण वाटत असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. यामुळे गंभीर दुष्परिणाम टाळणे शक्य आहे.

अभ्यास, परीक्षा, नोकरी, व्यवसाय, आर्थिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध यामुळे अनेकदा मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक ठरते. आपल्या मनातील दबलेल्या भावना व्यक्त झाल्यास मदत शक्य होते आणि आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गापर्यंत जाण्याआधी मदतीसाठी आपले दाेन हात पुढे पुढे सरसावू शकतात.

अशा व्यक्तींची मानसिकता समजून घ्या
प्रत्येक जणाने आपले मित्र, मैत्रीण, सहकारी, शिक्षक, पालक, नातेवाईक, शेजारी या नात्याने संबंधित व्यक्तीला समजून घ्यावे. त्याचे विचार जाणून घ्यावे. तुमचा एक मिनिट देखील एक आत्महत्या थांबून शकतो.- डाॅ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ञ

बातम्या आणखी आहेत...