आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये 11 महिन्यात 343 आत्महत्या:तरुण प्रेमभंग अन् मानसिक तणाव व्यसनाधिनतेमुळे संपवताय जीवन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर मानसिक तनाव वाढला होता. सर्व निर्बंध खुले झाल्याने प्रत्येक जण आपले आयुष्य खुशाल चेंडु प्रमाणे जगत आहे. मात्र यामधील बहुतांशी तरुण विविध मानसिक तनावात आहेत. प्रेमभंग व्यसनाधिनता, आणि मानसिक तनावातून जानेवारी ते नोव्हेंबर 2022 अखेर 343 आत्महत्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण 14 ते 30 वयोगटातील आहे.

आत्महत्येची खूप कारणं असू शकतात. जेनेटीक कारण आहे. ठराविक प्रकारची जनुके एखाद्याच्या शरीरात असतील तर आत्महत्या करण्याची प्रवृत्ती जास्त असते मेंदूत काही ठराविक न्यूरोट्रान्समीटर्स किंवा तत्सम काही घटकांचे प्रमाण कमी असेल तरी सुद्धा आत्महत्येचा धोका जास्त असतो काही प्रमाणामध्ये अनुवंशिकता असते.

व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म, संकटांमध्ये वागण्याची एक नैसर्गिक पद्धत, घरातील सदस्य, मित्रपरिवाराचा आधार, हे देखील आवश्यक आहे. मानसिक आजार असेल तर आत्महत्येचा धोका वाढतो. डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनियासारख्या आजारांमध्ये आत्महत्येचे प्रयत्न जास्त प्रमाणात दिसतात, आणि योग्य उपचार न झाल्यास अनेक व्यक्तींना आत्महत्येने जीव देखील गमवावा लागतो.

मात्र दोन वर्षाच्या कालावधीत तरुणांमध्ये प्रेमभंग, व्यसनाधिनता, करिअरची चिंता अदी कारणांतून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत संबधित व्यक्तीला मानसिक आजाराची लक्षण वाटत असल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

यामुळे गंभीर दुष्परिणाम टाळणे शक्य आहे. अभ्यास, परीक्षा, नोकरी, व्यवसाय, आर्थिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध अनेकदा मानसिक ताण तणाव वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. भावना व्यक्त झाल्यास मदत शक्य होते आणि आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गापर्यंत जाण्याआधी आपल्याला मदत एकादे दोन हात पुढे सरसावू शकतात.

अशा व्यक्तींची मानसिकता समजून घ्या

मानसोपचार तज्ञ डाॅ. हेमंत सोननीस म्हणाले की, आपल्या पैकी प्रत्येकजण मित्र मैत्रिण सहकारी, शिक्षक, पालक, नातेवाईक, शेजारी या नात्याने संबधित व्यक्तीला समजुन घेऊन त्याच्या भावना ओळून त्याचा विचार बदलू शकतो. त्याच्या आयुष्यात काय चालू आहे, याकरीता वेळ द्या. तुमचा एक मिनिट देखील एक आत्महत्या थांबून शकतो.

आत्महत्याची आकडेवारी गळफास (विष प्रशान )

जानेवारी- 22 (4) फेब्रुवारी- 33,(6) मार्च- 38 (6) एप्रिल- 32 (5) मे- 35( 10) जून 39,(9) जुलै- 40 ( 7) ऑगस्ट- 30 (6) स्प्टेंबर- 19 (9) ऑक्टोंबर- 23 (1) नोव्हेंबर- 26 (4) डिसेंबर दि.14 अखेर- 16 (0)

बातम्या आणखी आहेत...