आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध स्पर्धा:राज्य कराटे स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांचा‎ सहभाग, विजेत्यांना पारिताेषिके‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर येथील सुदर्शन लाॅन्स‎ येथे आर्यन कराटे स्पोर्ट‌्स‎ अकॅडमीतर्फे १२ राज्यस्तरीय‎ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले‎ होते. या स्पर्धेत नाशिक, अकोले‎ (संगमनेर), सटाणा, पुणे, मुंबई‎ यांसह राज्यभरातील विविध‎ शहरांतून आलेल्या ३५०‎ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला‎ होता. स्पर्धा विविध वयोगटांत‎ काता व कुमिते (फाइट) या‎ प्रकारात झाली. सुवर्ण, रजत‎ आणि कांस्यपदके देऊन‎ विद्यार्थ्यांना गाैरविण्यात आले.‎

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे‎ महानगरप्रमुख सुधाकर‎ बडगुजर, मदन डेमसे, जिल्हा‎ न्यायाधीश कीर्ती कातकडे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एस.एस.के पब्लिक स्कूलच्या‎ मुख्याध्यापिका उज्वला‎ कातकडे, राजमुद्रा फाउंडेशनचे‎ बाळकृष्ण शिरसाठ आदी प्रमुख‎ पाहुणे उपस्थित होते. या‎ स्पर्धेसाठी एस.एस.के.एम. व‎ प्रशिक्षक कैलास लबाडे व वीर‎ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.‎ आर्यन कराटे स्पोर्टस्‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अकॅडमीच्या अध्यक्ष शीतल‎ सानप, आर्यन सानप, निखिल‎ बच्छाव, ज्ञानेश्वर बच्छाव,‎ पायल डेमसे, सुमित चौधरी,‎ विशाल मोरे, दीक्षा वावले, गर्व‎ बरेलीकर, विशाल राऊत,‎ अरविंद सदार, अक्षदा चव्हाण,‎ संजल साळके, तनुश्री शहाणे,‎ श्वेतांजली यादव उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...