आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो साधू-महंतांकरिता तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधूग्राम तसेच अन्य सुविधांकरिता यापूर्वी ताब्यात आलेली ७० एकर जागा वगळता जवळपास ३५४ एकर जागा संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी अंदाजे ४ हजार १२७ कोटी रुपये लागणार असल्याचा प्राथमिक अहवाल महापालिकेने केंद्र व राज्य शासनाला पाठविण्याची तयारी अंतिम केली आहे.
२०२६-२७ मधील आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकास्तरीय सिंहस्थ समन्वय समिती स्थापन झाली आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत साधूग्राम व अन्य सुविधांसाठी आवश्यक भूसंपादनाचा आढावा घेतला गेला. तपोवनातील तब्बल २६४ एकर जागेवर साधूग्रामचे आरक्षण असून १७ एकर जागा पार्किंग व अग्निशमन दलासाठी आरक्षित आहे.
यापैकी सद्यस्थितीत ५४ एकर जागा पालिकेने गत सिंहस्थकाळात प्रत्यक्ष वाटाघाटीद्वारे तसेच टीडीआरच्या माध्यमातून संपादित केली होती. तर सुमारे साडेतेरा एकर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. दरम्यान, पुढील नियोजनाचा भाग म्हणून किती जागा संपादित करावी लागेल याचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासांती ४ हजार १२७ कोटींची गरज लागणार आहे. एवढी माेठी आर्थिक तरतूद करणे पालिकेला शक्य नसल्याने नेमके काय करायचे याचे केंद्र व राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे.
उज्जैनसह अन्य ठिकाणांचा करणार अभ्यास दौरा मध्य प्रदेशमधील उज्जैनसह ज्या प्रमुख भागात सिंहस्थ कुंभमेळा भरवला जाताे, तेथे साधूग्रामसाठी कशा पद्धतीने जागा आरक्षित केली गेली. त्यासाठी रोखीत भूसंपादन झाले की टीडीआरचा पर्याय वापरण्यात आला, अशा सर्व बाबींचा अभ्यास करण्याचा निर्णय महापालिकेच्या नगररचना विभागाने घेतला आहे. याबाबत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.