आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभदायक:नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ग्रह-नक्षत्रांचे 36 शुभयोग; जमीन, घर व दुकानासारखी स्थावर मालमत्ता खरेदी लाभदायक

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओमप्रकाश सोनवणे | ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही शुभ खरेदीचे योग आहेत. पहिला मुहूर्त १५ नोव्हेंबरला आहे, तेव्हा मंगळ पुष्याचा विशेष संयोग असेल. जमीन, घर, दुकान यांसारखी स्थावर मालमत्ता खरेदी करणे फायदेशीर ठरेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांत असे ३६ शुभ मुहूर्त आहेत. त्यापैकी १४ नक्षत्रांवर आधारित आणि २२ योगांवर आधारित आहेत. ज्योतिषांच्या मते, स्थावर मालमत्ता आनंददायी असते. त्यामुळे विशेष ग्रह-योगात त्यांची खरेदी शुभ मानली जाते.

मंगळ हा भूमिपुत्र मानला जातो, असे राष्ट्रीय ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर शास्त्री सांगतात. पुष्य नक्षत्र खरेदीसाठी शुभ. त्यामुळे मंगळाचा पुष्याशी संयोग स्थावर मालमत्ता म्हणजेच जमीन, घर, दुकान खरेदीसाठी उत्तम आहे. ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार विशेष योगात मालमत्ता खरेदी सुख-समृद्धीकारक असते.

वापराच्या आधारावर खरेदी... पंचांगकर्ते पं. चंदन व्यास यांच्या मते शास्त्रानुसार गुरुवार-शुक्रवारी खरेदी केलेली मालमत्ता लाभदायक असते. लग्नाचे तीन प्रकार आहेत - चर, स्थिर व द्विस्वभाव. आपल्याला तिथे राहायचे असेल तर स्थिर लग्न म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ लग्न असताना खरेदी करावी. कारखाना किंवा व्यवसायासाठी चर म्हणजे मेष, कर्क, तूळ व मकर लग्नामध्ये खरेदी करावी. वरीलप्रमाणे लग्न असताना मालमत्ता खरेदी केल्याने व्यवसायात वृद्धी होते.

योगावर आधारित
{नोव्हेंबर : १४ - सर्वार्थ सिद्धी, सोम पुष्य,
१५ - मंगळ पुष्य, २०, २३ - अमृतसिद्धी, २४, २७, २८ - सर्वार्थ सिद्धी, २०, २९ - द्विपुष्कर।
{डिसेंबर : ४, ६, ७, १३, २५, २६-सर्वार्थ सिद्धी, ११ - रवी पुष्य, १२ - सोम पुष्य, २१ व ३० - अमृतसिद्धी, २०, २४, २५ - त्रिपुष्कर। (मुहूर्त ज्योतिषांनुसार)

‘या’ नक्षत्रांमध्ये केलेली खरेदी ठरते शुभ
ज्योतिषी आचार्य पं. रामचंद्र शर्मा वैदिक यांच्या मते आश्लेषा, मघा, अनुराधा, विशाखा, पूर्वा भाद्रपद, पूर्वाफाल्गुनी, पुष्य आणि रेवती नक्षत्रांमध्ये शुभ आहेत. यामध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केल्याने मालमत्तेत वाढ होते आणि वापरकर्त्याची प्रगती होते. पितांबरा ज्योतिष पीठाच्या ज्योतिषी अर्चना सरमंडल यांच्या मते, मुहूर्त आणि ग्रह-नक्षत्रांच्या आधारे खरेदी केलेली संपत्ती जीवनातील इतर संकटांपासून वाचवते.

बातम्या आणखी आहेत...