आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नाशिकच्या व्यावसायिकाला रतलाममध्ये स्कॅप व्यवसायातून 36 लाखांचा गंडा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशातील रतलाममध्ये कंपनीच्या स्क्रॅपचा व्यावहार करणाऱ्या नाशिकच्या व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि सैलाब सहानी (रा. अंबड लिंकरोड, अजमेरीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १८ ऑक्टोंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत संशयित अजय कुमार गुप्ता (रा. रांची) प्रितीश मुंग मोडे (रा. नागपूर) अमीर, अरुण (पूर्ण नाव नाही, रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांच्या मध्यस्थीने रतलाम औद्योगिक वसाहतीमधील खेतान अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचा स्क्रॅपचा माल घेण्यासाठी रतलामला गेले होते. येथे दोन ट्रकमध्ये स्क्रॅप भरलेले होता. सर्व माल बघून वजन करून हा व्यवहार केला. १० लाखांची रोख रक्कम दिली. रतलामला गेट पास काढला. संशयितांनी दुसऱ्या गाडीचाही गेट पास करायचा असल्याने आणखी पैशांची मागणी केली.

सहानी यांनी आरटीजीएसद्वारे वेळोवेळी ३६ लाख ६८ हजार रुपये दिले. गाड्यांचे गेट पास झाल्यानंतर ट्रक पाठवून देण्यास सांगीतले आणि सहानी नाशिकला परतले. दाेन दिवस होऊनही संशयितांनी स्क्रॅपचा ट्रक पाठवले नसल्याने संपर्क साधला असता संशयितांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...