आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:बिटकाे रुग्णालयात महिनाभरातच 360 एमआरआय, 200 सिटी स्कॅनच्या तपासण्या

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सात वर्षांपासून महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालय अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालय परिसरातील रुग्णांना प्रतीक्षा असलेल्या सिटी स्कॅन आणि एमआरआय यंत्रणा ‘दिव्य मराठी’च्या पाठपुराव्यानंतर अखेरीस सुरू झाली. महिनाभरापूर्वीच ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले हाेते. त्यानंतर लगेचच यंत्रणा सुरू झाली हाेती. आता महिनाभरानंतर येथे १९६ सिटी स्कॅन आणि ३६० रुग्णांचे एमआरआयच्या तपासणीचे अहवाल काढण्यात आले आहेत.

मनपाच्या बिटकाे रुग्णालयात सर्व सुविधा असताना व सिटी स्कॅन आणि एमआरआयची सुमारे १० काेटींहून अधिक खर्चाची यंत्रणा उपलब्ध करून दिलेली असताना त्याचा वापर हाेत नसल्याने आंदाेलनेही झाली हाेती. नाशिकराेड परिसरातील किमान दीड ते दाेन लाख लाेकसंख्येच्या नागरिकांना आणि नजकीच्या २० ते २५ खेडी, उपनगरांतील गरीब रुग्णांना एमआरआयसाठी मविप्रच्या मेडिकल काॅलेज हाॅस्पिटलमध्ये किंवा एसएनबीटी हाॅस्पिटल येथे जावे लागत हाेते. २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उपलब्ध निधीतून मनपा बिटको रुग्णालयाकरता यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली होती. तज्ज्ञांचे मनुष्यबळ उपलब्ध हाेत नसल्याने महापालिकेने आउटसोर्सिंगद्वारे तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करून मशिनरी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...