आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:पुणे विद्यापीठातर्फे 26 मार्चला 38 वी सेट परीक्षा, अर्जासाठी 30 पर्यंत मुदत

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ३८ व्या सेट परीक्षा २६ मार्च २०२३ ला होणार असून या परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. सेट परीक्षेसाठी विद्यार्थी ३०नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करू शकतील. तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत १ ते ७ डिसेंबर आहे.

सेट परीक्षेचा अर्ज आॅनलाइन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची संपूर्ण माहिती setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करूनदेण्यात आली आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यू. जी. सी (नवीदिल्ली) मान्यताप्राप्त नोडल एजन्सी म्हणून या सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव तथा सदस्य सचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...