आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०१८ पासून प्रतीक्षा यादीत असलेल्या ३९८ सहाय्यक लाेकाे पायलटला अखेर रेल्वेत संधी मिळाली आहे. त्यांना नुकतेच रूजू करून घेण्यात आले. याशिवाय देशातील ५८४१ सहायक लाेकाे पायलट पदाची भरती रेल्वे प्रशासनाने नुकतीच केली. यात महाराष्ट्रातील ५०० उमेदवारांचा समावेश आहे. यासाेबतच ११८० उमेदवारांना टेक्निशियन म्हणून सामावून घेण्यात आले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांनाही संधी मिळाली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील कार्यक्रमात याबाबतची माहिती दिली. ३९८ उमेदवारांचा मेळावा व भरती प्रक्रियेबद्दल दानवे यांचा सत्कार आयाेजित करण्यात आला. रेल्वेला स्वत:ची आई समजून तिचा सांभाळ करा, जेथे पाेस्टिंग मिळेल तेथे काम करा, बदलीसाठी प्रयत्न करू नका. नवनवीन संकल्पना राबवून रेल्वेचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन दानवे यांनी या कार्यक्रमात केले.
अनेकवेळा प्रयत्न करूनही प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळत नसल्याने काही उमेदवारांनी २०२२ मध्ये महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील व भाजयुमाेचे शहर उपाध्यक्ष अमाेल पाटील यांच्याकडे मध्यस्थी करण्याची विनवणी केली हाेती. पाटील कुटुंबियांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ३९८ पदांची भरती झाली. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते माजी दिनकर पाटील व अमाेल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर, रेल्वेचे डीआरएम आदी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.