आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल चोरी:टाेळीकडून 4 कारच्या काचा फाेडून चाेरी ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कारच्या काचा फोडून कारमध्ये ठेवलेल्या बॅगा, वस्तू चोरी करणारी टोळी कार्यरत असून शहरात एकाच दिवशी दाेन ठिकाणी प्रत्येकी दोन कारच्या काचा फोडून पावने दोन लाखांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला. मुंबईनाका परिसरातील साई स्क्वेअर तिडके काॅलनीसह सीसीएम माॅल, लवाटेनगर येथे हे प्रकार घडले. मुंबईनाका, गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि डाॅ. सुनीता संकलेचा (रा. गोविंदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भास्कर इएनटी हाॅस्पिटल साई स्क्वेअर, तिडके काॅलनी येथे हाॅस्पिटलच्या पार्किंगमध्ये एमएच १५ जीए ४०२० कार उभी असतांना पुढील दरवाजाची काच फोडून कारमधील मोबाइल, लॅपटाॅप, चोरी गेला. शेजारीच उभी असलेली डाॅ. माधुरी वारुंगसे यांच्या आणि नंदकिशोर नेरकर यांच्या कारच्याही काचा फोडून लॅपटाॅप चोरी करण्यात आला. लवाटेनगर येथे अमोल तळेकर रा. कोथरुड पुणे हे कारने एमएच ११ बीएच ८६८४ ने सीसीएम माॅल येथे आले होते. पार्किंगमध्ये कार उभी करून ते जवळच चहाच्या दुकानात मित्रा सोबत चहा पिण्यास गेले. या वेळेत चोराने काच फोडून पाठीमागील सीटवर असलेल्या बॅगमधील लॅपटाॅप आणि मित्र गणेश निफाडे यांच्या बॅगमधील हार्ड डिक्स, एटीएम कार्ड, कागदपत्रांची चोरी केले.

बातम्या आणखी आहेत...