आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाठे गल्ली परिसरातील धवलगिरी साेसायटी व शंकरनगर परिसरातील इमारतीच्या पार्किंग व रस्त्यावर उभ्या असलेल्या चार कारच्या काचा बुधवारी मध्यरात्री टवाळांनी फाेडल्या. तीन संशयितांना तपाेवनातून ताब्यात घेण्यात आले.
रवींद्र शाळेजवळील बरखाबहार साेसायटीतील साैरभ मराठे यांचे चारचाकी वाहन (एमएच ०४ जीयू ८३२४ ), रवींद्र शाळेसमाेर लावण्यात आलेली मुर्तंजा अत्तरवाला यांची (एचमएच ४८ पी ०७१६,) धवलगिरी साेसायटी परिसरातील सीमा पेठकर यांच्या घरासमाेरील चारचाकी (एमएच १५ जीएस ५५१०) व शंकरनगर परिसरातील सिद्धेश भडके यांची (एमएच १५ डीएस २८०५ ) यांच्या कारच्या काचा टवाळखाेरांनी रात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकीवर ट्रिपल येत फाेडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
भद्रकाली पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दत्ता पवार आणि सहकाऱ्यांनी दुकानामधील सीसीटीव्हीच्या आधारे संशयित नीलेश पवार, सुमीत पगारे, विकी जावरे या टवाळखाेरांच्या तपाेवनातून मुसक्या आवळल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.