आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या भरा पाणीपट्टी:ऑनलाइन पाणीपट्टी भरल्यास सोमवारपासून चार टक्के सवलत; थकबाकी वसुलीसाठी महापालिकेची बंपर योजना

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक खडखडाट दूर करण्यासाठी महापालिकेने आता घरपट्टी पाठोपाठ पाणीपट्टीमध्ये सवलत योजना सुरु केली आहे. येत्या सोमवार (दि.13) पासून ऑनलाईन अ‍ॅपमधून पाणीपट्टीची संपूर्ण वर्षभराची रक्कम भरल्यास चार टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी अ‍ॅपद्वारे पाणीमीटरचे रिडींग घेवून अ‍ॅपवर अ‍पलोड करावे लागणार आहे.

पालिका आयुक्त रमेश पवार हे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन उपाय योजत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, नियमित करदात्यांना घरपट्टी भरणाऱ्या साठी सवलत योजना जाहीर केली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यातच घरपट्टीपोटी पालिकेला 54 कोटी रुपयांचा महसुल मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत 35 कोटींची घसघशीत वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेता आता पाणीपट्टी ऑनलाइन भरल्यास चार टक्के सवलत दिली जाणार आहे.

अशी मिळेल सवलत

ऑनलाईन पाणीपट्टी भरणाऱ्यांना सद्यस्थितीत एक टक्का सवलत दिली जाते. आता पाणीपट्टीचे देयक निर्धारित मुदतीत भरल्यास आणखी तीन टक्के या प्रमाणे 4 टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत योजना जुलै 2022 पासून उपलब्ध होवू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या अ‍ॅपसाठी करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले.

स्वतः बिल अपलोड करावे लागणार

पाणीपट्टीसाठी गुगल प्ले स्टोअरवर महापालिकेचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असून हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर मोबाईल फोनद्वारेच नागरिकांना पाणीपट्टीचे देयक उपलब्ध होणार आहे. पाणीपट्टीकरीता करवसुली विभागासाठी देखील अ‍ॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींगचा फोटो अ‍ॅपवर अपलोड केल्यानंतर नळ कनेक्शन धारकास व्हॉट्स्अ‍ॅप, ई-मेलवर पाणीपट्टीचे ई-बिल तात्काळ पाठविले जाईल. या अ‍ॅपवर नागरिकांना आपल्या पाणीमीटरचा फोटो काढून अपलोड करावा लागेल. फोटो अपलोड केल्यानंतर महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात त्याची फेरतपासणी करून तात्काळ देयक पाठविले जाईल.

मीटर नादुरूस्त असल्यास दुप्पट दंड

मीटर नादुरूस्त असल्याचे आढळून आल्यास अथवा मीटरच नसल्यास पाणीपट्टीपोटी संबंधित नळ कनेक्श धारकाकडून सरासरी बिलाच्या दुप्पट दंड आकारला जाईल. त्यामुळे येत्या 15 दिवसात मीटरची दुरूस्ती करून घ्यावी. तसेच ज्यांनी अद्याप मीटर बसविलेले नाहीत त्यांनी मीटर बसवून घ्यावेत असे आवाहन पालिकेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...