आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये एकाच रात्रीत 4 घरफोडी:20 लाखांचा ऐवज लंपास; स्वीट मार्ट फोडून 15 लाख रुपये लांबविले

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूररोडवरील एका स्वीट मार्ट चे दुकानाच्या गॅलरीतून प्रवेश करत कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच तोडून 15 लाखांची रोकड चोरी करण्यात आली. सागर स्वीट विद्या विकास सर्कल गंगापूर रोड येथे हा प्रकार घडला. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाच रात्री चार घरफोडीच्या गुन्ह्यात सुमारे 25 लाखांचा ऐवज चोरी करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि रतन चौधरी रा. लवाटे नगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गंगापूररोडवर विद्या विकास सर्कल येथे सागर स्वीट्स नावाचे शाॅप आहे. येथे चौधरी यांचे ऑफीस आहे. स्वीट मार्टच्या मोकळ्या गॅलरीतून आत प्रवेश केला. ऑफिसच्या दरवाजाचे लॅच उचकटून आत प्रवेश केला. ऑफिसच्या लाकडी टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले सुमारे 15 लाखांचीच रोकड चोरी करुन नेली. सुनिल निगळ रा. निगळ मळा सातपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घराचे दरवाजाचे कुलुप तोडून 53 हजारांचे सोन्याचे दागिने आणि एलईडी टिव्ही चोरी करुन नेला. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल शुक्ला रा. शास्त्री नगर गोरेवाडी यांच्या तक्रारीनुसार, शुक्ला कुटुंबियासह लग्न समारंभाला गेले असतांना बंद घराचा दरवाजा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने असा 33 हजारांचा ऐवज चोरी केला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता सिंग रा. नवी मुबंई हे बनचाळ देवळाली कॅम्प येथे आले होते.ते बाहेर गेल्यानंतर दरवाजाचे कुलुप तोडून 1 लाख 41 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ

शहरात घरफोजडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे वाढत्या घटनांतून निदर्शनास येत आहे.स्थानिक पोलिसांची गस्त होत नसल्याने घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे

बातम्या आणखी आहेत...