आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन:4 उद्योगांना आग; लाखोंचे साहित्य खाक ; पाच अग्निशमन बंबांनी विझवली तीन तासांत आग, शेडचेही नुकसान

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या चार लघू उद्योगांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत या उद्योगांचे साहित्य जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले. लगत असलेल्या तीन उद्योगांनाही मोठी झळ बसली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले हे उद्योग पत्र्याचे गाळेवजा शेडमध्ये एकमेकास लागून आहे. या उद्योगांपैकी एका उद्योगात दुपारी साडेचार वाजता आग लागली. अंबड औद्योगिक वसाहत अग्नीशमन विभागाचा बंब येथे तातडीने पोहोचला. त्यानंतर सिडको व सातपूर अग्नीशमन केंद्राचे प्रत्येकी दोन बंब येथे पोहोचले, ३ तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. श्लोक एंटरप्रायजेस ही क्लिनिंग मटेरीयलची कंपनी तर लान्सर अॅण्ड कंपनी ही फायबर मोल्डींगची कंपनी, स्प्रे पेंटींगची जे.पी.इंटरनॅशनल आणि पावडर कोटींगची आस एंटरप्रायजेस असे या कंपन्यांची नावे आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज असून कंपन्यांमधील उत्पादन व साहित्य आगीला पुरक असल्याने तसेच एलपीजी सिलेंडर असल्याने स्फोट झाला. त्यामुळे आग वेगाने पसरल्याचे समजते. दुर्घटनेने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

पाच बंबांनी तीन तासांत आगीवर नियंत्रण ^कुलस्वामीनी इंटस्ट्रीयल एरीया ये खासगी सर्वे क्रमांकामध्ये हे उद्योग असून येथे सात असलेल्या सातपैकी सहा सिलिंडरचा ब्लास्ट झाला. सातपूर, सिडको येथील बंबही तातडीने पोहोचले. तीन तासांत आग विझविण्यात यश आले. लगत असलेल्या साइचैतन्य लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड, सिध्दीविनायक इंजिनिअरींग टेक्नो इंडस्ट्रीज यांचेही मोठे नुकसान झाले आहे. -आशिष मोरे, स्टेशन इंचार्ज, अग्नीशमन केंद्र

बातम्या आणखी आहेत...