आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना मिळून आतापर्यंत तब्बल ४ लाख ८७ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यातील ४ लाख ७४ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरुन आपले प्रवेशही निश्चित केले आहे. दरम्यान, १५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशाची मुदत असून, आता शेवटचे २ दिवस शिल्लक असल्याने अद्यापही प्रवेश घेतला नसलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यानुसार दरवर्षी मे-जूनदरम्यान प्रवेशप्रक्रिया सुरु केली जाते. यंदाही ती अगदी वेळेतच सुरू झाली. परंतु १२ वीसह इतर विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षा अन् त्यामुळे निकालही विलंबाने लागले. परिणामी प्रवेशालाही विलंब होत असून मुक्त विद्यापीठाने आॅगस्ट महिन्यात संपणारी प्रक्रिया थेट नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू ठेवली. पाच लाख प्रवेशाचे उद्दिष्ट असताना आजच्या स्थितीत विद्यापीठात तब्बल ४ लाख ८७,५६९ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने पाच लाखांचे उद्दिष्टही पूर्ण होण्याची शक्यता विद्यापीठाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
सर्वाधिक प्रवेश स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस
सर्वाधिक प्रवेश हे स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज् अॅण्ड सोशल सायन्सेस या अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक २ लाख ६२ हजार २८५ इतके प्रवेश झाले आहेत. त्याखालोखाल स्कूल ऑफ कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंटला ८५ हजार ९१४, स्कूल ऑफ आर्किटेक्चर सायन्स अॅण्ड टेक्नाॅलॉजी ११ हजार २४२ इतके प्रवेश झाले आहे.
४५० विद्यार्थ्यांनी भरले दोनदा शुल्क
आॅनलाईन शुल्क भरण्याची सुविधा आहे. अनेकदा सर्व्हरची अडचण असते. तर काही वेळा पैसे भरल्यानंतर ते जमा झाल्याचा संदेश किंवा नोटीफिकेशन मिळत नाही. परिणामी संबंबधित विद्यार्थ्याकडून पुन्हा शुल्क भरले जाते. त्यांना ते पुढील १५ दिवसांत परत दिले जाणार असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. प्रकाश देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.