आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट:बाजार समितीत टोमॅटो क्रेटला 40 रुपये भाव

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाच्या असंतुलनामुळे नेहमीच अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता टोमॅटोमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. बाजार समितीत अवघ्या चाळीस रुपये क्रेटने टाेमॅटाेची विक्री हाेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून टोमॅटो काढून बाजार समितीपर्यंत येणे जिकिरीचे होत आहे.

रात्रंदिवस मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्यात मध्येच अवकाळी पाऊस आल्याने त्यापासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले. शेतकऱ्यांकडून ४० रुपयांना २० किलोची जाळी घेतली जात असली तरी खुल्या बाजारपेठेत मात्र ग्राहकांना वीस रुपये किलो याप्रमाणे टोमॅटोची विक्री केली जात आहे.

राजकारणामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा दुर्लक्षित : एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल किमतीत मालाची विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे मात्र राजकारण्यांकडून हे मुद्दे दुर्लक्षित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

बातम्या आणखी आहेत...