आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:शिवसेनेचा हात साेडलेले 40 दगड बुडणारच, त्यांना जनताच बुडवणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा हात साेडलेले खाेक्यांचे दगड पाण्यात बुडणारच अन‌् त्यांना जनताच बुडवणार आहे. कारण आता लाेकच निवडणुकांची वाट बघत आहे. मात्र गद्दारांमध्ये निवडणूक घेण्याची हिंमत नाही. आगामी महापालिका, विधानसभा व लाेकसभा निवडणुकीत या गद्दारांना लाेक बुडवणारच असून कडव्या शिवसैनिकांनीही आरपारच्या लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

नाशिकमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचा मेळावा आयाेजित करण्यात आला हाेता. या मेळाव्यात खासदार राऊतांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. या सरकारची खाेके सरकार म्हणून जगाच्या कानाकाेपऱ्यात आेळख झाली आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राेज अवमान हाेत असताना हे सरकार हात चाेळत बसले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे पंडित नेहरू, माेरारजी देसाई यांना आम्ही माफी मागायला लावली. मात्र या मिंदे सरकारच्या काळात राज्यपाल, भाजपचे मंत्री राेज महाराजांची बदनामी करत आहेत. आता आम्ही काय करणार हे लवकरच कळेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

खा. राऊत म्हणाले... मनपा, विधानसभा, लाेकसभा अशा काेणत्याही निवडणुका घ्या, आम्ही तयार {स्वाभिमान अजीर्ण झाला म्हणून गद्दारांनी पक्ष साेडला. आता छत्रपतींचा राेज अपमान हाेत असताना हे ४० शेपूट घालून बसले. {प्रत्येकाच्या जीवनात संघर्षाचा काळ येतो, कारागृहात असताना नाशिककरांनी सर्वात जास्त साथ दिली. {राजकिय द्वेष समोर ठेवून मला अटक, सत्य माणसाला निर्भय बनवते. {गद्दारांच्या तिरडीला खांदा लावणारे खासदार गाेडसेच गद्दारांच्या तिरडीवर गेले. { बंडखाेरांची राजकीय तिरडी निघणारच, राजकारणातून ते नामशेष हाेणार. {आधी छत्रपतींचा अवमान दूर करा, मग भवानी तलवार आणा. { महापालिका, विधानसभा, लोकसभा काेणत्याही निवडणुका घ्या आम्ही तयार आहाेत. {४० पैकी एकही निवडून येणार नाही. उत्तर महाराष्ट्रात तर नाहीच नाही {महाराष्ट्र इतिहास घडवतो, तो इतिहास पायदळी तुडवण्याचे काम सुरू. {करारा जबाब मिलेंगा, आता करून दाखवणार. {उद्धव ठाकरे यांना नाशिकचे आमंत्रण देऊ, नाशकात विशाल सभा घेऊन सभेचे रूप महाराष्ट्राला दाखवू.

बातम्या आणखी आहेत...