आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:40 दृष्टिबाधित; बहुविकलांगांना स्पर्धा परीक्षेसाठी संशाेधन अन् प्रशिक्षण केंद्र

सचिन जैन | नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दृष्टिबाधित वा बहुविकलांग विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आयएएस, आयपीएस तसेच विविध पदावर जाता यावे यासाठी नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र संस्थेने पुढाकार घेतला आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दृष्टिबाधित व विकलांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेच्या वतीने ४० विद्यार्थ्यांचे निवासी प्रशिक्षण व संशाेधन केंद्र उभारण्यात येत आहे.या ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्णत: माेफत मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाणार आहे.विशेष म्हणजे राज्यात अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प शहरात साकारला जात आहे.

नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र संस्थेच्या वतीने दृष्टिबाधित, बहुविकलांग िवद्यार्थी, नागरिकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात दिला जाताे. राज्य वा केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेत दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी यश मिळवावे, शासनाच्या उच्चस्तरीय अधिकारी बनावे यासाठी संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अशा विद्यार्थ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळावे, त्याची अभ्यासाची पूर्ण तयारी व्हावी, वेगवेगळे अधिकारी व शिक्षकांकडून त्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी सातपूर परिसरातील नॅब संस्थेच्या परिसरात दाेन मजली निवासी प्रशिक्षण व संशाेधन केेंद्र उभारले जात आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, बँक परीक्षा तसेच अन्य प्रशिक्षणही पूर्ण माेफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

साधारणत: दाेन काेटी रुपये येणार खर्च
ही प्रशिक्षण संस्था उभारणीसाठी व विविध सुविधांसाठी साधारणत: दाेन काेटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी संस्थेला अनेक नागरिकांकडून आर्थिक मदत केली जात आहे. राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनीदेखील या प्रकल्पासाठी २० लाख रुपयांची मदत केली आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी माेफत प्रशिक्षण
दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतही यश मिळावे यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. या माध्यमातून माेफत मार्गदर्शन केले जाणार असून ते दृष्टिबाधितांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. - रामेश्वर कलंत्री, राज्य अध्यक्ष, नॅशनल असाेसिएशन फाॅर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र

प्रशिक्षण केंद्र ठरणार महत्त्वपूर्ण
४० दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या निवासाची साेय
हाेऊन निवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. अशाप्रकारे राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना दिशा मिळेल.- मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सचिव, नॅशनल असाेसिएशन फाॅर द ब्लाॅइंड युनिट महाराष्ट्र संस्था

बातम्या आणखी आहेत...