आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपाई:पालिकेत 400 कोटींची तूट; विविध करांत किरकाेळ वाढ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग तिसऱ्या वर्षी देखील महापालिकेच्या महसुलात तब्बल चारशे कोटींची तूट आल्याने प्रशासनाने त्याची भरपाई करण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासह घरपट्टी, पाणीपट्टी वगळता अन्य सर्व प्रकारचे कर, दर, शुल्क व दंड यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लेखा विभागाला दिले आहेत.

डिसेंबर महिन्यात पालिकेचे सुधारित अंदाजपत्रक तयार होणार असल्याने आयुक्तांनी शुक्रवारी (दि. २) उत्पन्नाच्या जमा खर्चाचा आढावा घेतला. घरपट्टी व पाणीपट्टीतून उत्पन्नात वाढ आहे. आता त्यानुसार घरपट्टी, पाणीपट्टी, नगरनियोजन, मिळकत, अग्निशमन, घनकरा, मलेरिया विभागाने यादी सादर केली. यावेळी आयुक्तांनी गरजेनुसार करवाढ करावी,अशा सूचना दिल्या. तसेच महसूल गळतीची कारणे, प्रशासकीय यंत्रणेतील तांत्रिक व अतांत्रिक त्रुटी, संगणकीय प्रणालीतील त्रुटी अथवा दोष, याबाबतही तपशीलवार माहिती बैठकीत सादर केली आहे.

पालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची विभागीय कार्यालयात दखल घेतली जात नसल्याची तक्रार आल्यानंतर आता आयुक्तांनी सहा विभागीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक सोमवारी बोलवली आहे. यात अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...