आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परिसर स्वच्छ राहिला तर स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचेही संवर्धन होण्यास मदत होत असते. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नाशिक प्लॉगर्स या तरुणाईच्या ग्रुपकडून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता मोहीम राबवत पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून ४०० किलोहून अधिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. नाशिक प्लॉगर्सद्वारे मिशन क्लीनअप मोहिमेद्वारे शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. या स्वच्छता मोहिमेत सहभागी तरुण-तरुणींकडून स्वच्छता मोहिमेबरोबर नागरिकांचे प्रबोधनदेखील केले जात आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता करण्यात आली. साईनाथनगर ते बोगद्यापर्यंत जॉगिंग ट्रॅकसह परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्चात आला. विशेष म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून ४०० किलोहून अधिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले.तरुणाईच्या या मोहिमेत स्वच्छतेबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविले. चंद्रकिशोर पाटील यांचाही सहभाग होता. स्वच्छतेसाठी तरुणाईकडून राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे उपस्थित नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
नियमित मोहीम राबविण्याचे आवाहन आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी दर आठवड्यात स्वच्छता मोहीम आपापल्या परिसरात राबवली तर शहर स्वच्छ-सुंदर होण्यास मदत होईल, असे आवाहन नाशिक प्लॉगर्सच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.