आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायत्री परिवार हरिव्दार यांच्याकडून सध्या देशभरात भारतीय संस्कृती ज्ञानपरीक्षा घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात 5 वी ते 12 वी पर्यंतचे तब्बल 4 हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. तसेच पेठ आणि सुरगाणा या आदिवासी व दुर्गम तालुक्यातील 1800 विद्यार्थ्यांचा तर नाशिक शहरातील 2100 विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे. भारतीय संस्कृतीचे ज्ञान संवर्धनासह विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गाेडी लागावी अशी रचना या परीक्षेची आहे.
भारतीय संस्कृती ज्ञानपरिक्षा ही गायत्री परीवार हरिव्दारकडून गेल्या 18 वर्षांपासून देशभरात घेतली जाते, त्याला दरवर्षी कराेडाे विद्यार्थी सहभागी हाेत असतात. केवळ हिंदू धर्मच नाही तर भारतीय संस्कृतीत जे - जे धर्म आहेत, ते सर्व धर्म, जात, संंप्रदायांबाबतचा अभ्यास या स्पर्धेकरीता विद्यार्थ्यांना करावा लागताे. संस्कृती, ऋषी मुनी, सभ्यता, धर्मांबाबत, स्वातंत्र्यसैनिक, विविध धर्मांचे ग्रंथ काेणते काेणते? याबाबतचे बहुविध प्रश्न या परिक्षेकरीता असतात. सर्व धर्माचे विद्यार्थी यात ऐच्छिक सहभाग घेतात.
भारतीय संस्कृतीचे संवर्धन या परिक्षेच्या माध्यमातून हाेत असते, जिल्ह्यात 12 डिसेंबरला डांग सेवा समिति कळवण येथून सुरू झालेली परीक्षा गाव व शाळांनिहाय सुरू असून 23 डिसेंबरला खेडगाव येथील जवाहर नवाेदय स्कुल येथे समाराेप हाेइल. परीक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाते याशिवाय प्रत्येक शाळेतून प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गाैरव केला जाताे. राज्यातून प्रथम, व्दितीय, तृतिय क्रमांकाचे विजेते निवडले जातात, त्यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र बहाल केले जाते. अवघे 25 रूपये शुल्क आकारून परीक्षेकरीताची पुस्तके, साहित्य, उत्तर पत्रिका पूरविल्या जातात.
स्पर्धा परीक्षांची गाेडी लागते
या परीक्षेच्या उत्तर पत्रिका तंताेतंत शासकिय स्पर्धा परीक्षांप्रमाणेच असून त्याची तपासणी संगणकामार्फत एकत्रित केली जाते. चार प्रश्नांची लिखीत उत्तरे द्यावी लागतात तर इतर प्रश्न हे पर्यायी स्वरूपाचे असून स्पर्धा परीक्षांप्रमाणेच उत्तर पत्रिकांवर काळ्या पेनने उत्तर निवडून त्याच्या क्रमांकावर पेनने गाेळा करावा लागताे. यामुळे स्पर्धा परीक्षांची गाेडी विद्यार्थ्यांना लागते व सरावही हाेताे.
- जयगाेविंद पांडे, संयोजक, नाशिक जिल्हा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.