आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 41 Wards Will Come Into Existence According To Three member Division Of Nashik Municipal Corporation, Administration In Confusion Due To Ambiguous Order; The Councilors Are Confused

मनपाच्या वाढीव 11 जागांवर फुली:त्रिसदस्य प्रभागानुसार 41 प्रभाग अस्तित्वात येणार, संदिग्ध आदेशामुळे प्रशासन गोंधळात; नगरसेवक संभ्रमात

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन महिन्यानंतर नाशिकसह 24 महापालिकांमध्ये नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिल्यानंतर ठोस सूचना नसल्यामुळे तूर्तास तीन सदस्य प्रभाग रचना अंतिम मानून त्या संदर्भात कारवाई करण्याकरता प्रशासनाने पावले उचलली आहे. नवीन पत्रातील संदर्भानुसार 8 सप्टेंबर 2022 नुसार वाढीव 11 जागा कमी करून 122 सदस्य संख्येनुसार तीन सदस्य प्रभाग रचना तूर्तास करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास, तीन सदस्य रचनेनुसार 40 तर एक प्रभाग दोन सदस्यांचा याप्रमाणे 41 प्रभाग अस्तित्वात येतील.

दरम्यान, प्रभाग रचनेची कारवाई सुरू करताना पुन्हा एकदा शासनाचे तसेच अन्य महापालिकेंचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतल्याची माहिती उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली.

2021 मधील अंदाजित लोकसंख्या गृहीत धरून सर्वच महापालिकांमधील सदस्य संख्येत वाढ केली. त्यानुसार नाशिक महापालिकेत 11 जागा वाढवल्याने सदस्य संख्या 122 वरून 133 वर गेली होती. त्यामुळे महापालिका क्षेत्रात 44 प्रभाग अस्तित्वात आले होते. निवडणूक जाहीर होण्याच्या टप्प्यात असतानाच नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महापालिकेची प्रभागरचना, आरक्षण सोडत प्रक्रिया रद्द करत पूर्ववत 2011 नुसार सदस्यसंख्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत मात्र प्रभाग रचना कशी करायची याबाबत शासनाच्या कुठल्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाकडून अंतिम मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच अन्य मोठ्या महापालिका नेमकी काय कारवाई करत आहे याबाबतही चाचपणी केली जात आहे.

..तर 11 जागा वगळून 3 सदस्य प्रभाग रचना

महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांकरीता तीन सदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आताच्या सत्ताधारी भाजपाला 2017 प्रमाणे चार सदस्यीय प्रभागरचना हवी आहे. मात्र त्यासाठी कायद्यात करावी लागणारी दुरूस्ती अद्याप केलेली नाही. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभागरचनेची कायद्यातील तरतूद अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये 133 पैकी 11 जागा कमी करून 122 जागा नुसार तीन सदस्य प्रभाग रचना होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महापालिकांकडून मागवले मार्गदर्शन

''प्रभाग रचना करण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाले आहे मात्र त्यामध्ये बाबत ठोस मार्गदर्शन नसल्यामुळे राज्य शासनाकडून तसेच अन्य महापालिकांकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे.'' - मनोज घोडे पाटील, उपायुक्त,महापालिका

बातम्या आणखी आहेत...