आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील ४ हजार १२२ तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार आहे. त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील ६ िवभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहितीही मागविली आहे. त्यामुळे पुढील वर्षी तलाठ्यांचीही मेगा भरती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तलाठ्यांची सर्वाधिक १०३५ रिक्त पदे नाशिक विभागात आहेत.
शासनाने लिपिक व टंकलेखक पदांची मेगा भरती करण्यासाठी निर्णय घेऊन त्याबाबत एमपीएससीला माहिती सादर करण्यासाठी आदेश केले हाेते. शासनाने १४ विभागांची रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहिरात काढली हाेती.
समन्वयक अधिकारी नियुक्त
रिक्त पदांबाबतची व बिंदुनामावलीची माहिती शासनाला पाठविण्यासाठी विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्तांना समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वच जिल्ह्यांची माहिती दूतावासाद्वारे शासनास पाठविण्याचेही आदेश दिले आहेत.
१५ दिवसांत माहिती देणे बंधन
सर्वच माहिती विहित नमुन्यात विवरण पत्रात भरून जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून १५ दिवसांत सादर करण्याचे आदेशही दिले आहे. त्यामुळे आता सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले आहे.
आरक्षणनिहाय माहिती
तलाठी पदभरतीसाठी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करून सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय, जिल्हानिहाय तपशिलाची मागणी मंत्रालय स्तरावरून तातडीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाची लगबग सुरू आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.