आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आठ ठिकाणी लावलेल्या चेकिंग पाॅइंटवर झालेल्या कारवाईत ४२८ विनाहेल्मेट चालक आढळून आले. या चालकांकडून दाेन लाख १४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांच्या अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात १ डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी ५५४ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करण्यात आली. दाेन लाख ७७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी वाहतूक िवभागाच्या युनिट १ ते ४ मध्ये कारवाई करण्यात आली. आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील जत्रा हाॅटेल, रासबिहारी स्कूल, प्रसाद सर्कल, मॅरेथाॅन चौक, साईनाथनगर, कलानगर, दसक पूल, जेलरोड पाण्याची टाकी या आठ ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत वाहतूक विभागाचे आठ अधिकारी आणि २४ कर्मचारी सहभागी झाले होते. उपआयुक्त पौर्णिमा चौघुले, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरात अपघात वाढले हाेते. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे पाेलिस आयुक्तांनी थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू करत विनाहेल्मेट वाहनधारकांना चपराक लावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.