आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनाही दिलासा:निकष न पाळणाऱ्या जिल्ह्यातील 435 सहकारी सोसायट्यांना दिलासा; शेतकऱ्यांना करता येणार कर्जवाटप

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून जिल्ह्यात कर्जाचे निकष न पाळणाऱ्या (अनिष्ट तफावतीतील) 435 विविध कार्यकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्जवाटपासाठी निधी बंद करण्यात आला होता. त्यांना आता दिलासा मिळाला असून या सोसायट्यांना कर्ज वाटप करता येणार आहे.

शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा

​​​​​​याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या तसेच गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकप्रशासक व प्रशासकीय संचालक यांची एकत्रित बैठक घेत तातडीने या संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा बँकेच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले असून जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना सभासदांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येवल्यातील 23 संस्थांचा समावेश

जिल्ह्यात एकूण 435 अनिष्ट तफावतीतील संस्था असून यात येवल्यातील एकूण 23 संस्थांचा समावेश आहे. या संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत जिल्हा बँकेने अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना कर्ज पुरवठा न करण्याच्या निर्णय मागे घेऊन नियमित करण्याची मागणी करण्यात आली होती.

अटींची पूर्तता करण्याची सूचना

र्व घडामोडी झाल्यानंतर आता जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढले असून अटी शर्थीची पूर्तता करून सभासदांना कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याबाबत काढलेल्या परिपत्रकात काही अटी बंधनकारक केल्या आहेत. त्यानुसार सन 2022-23 हंगामात दिनांक 31 मार्च 2022 अखेरीस असलेल्या अनिष्ट तफावतीच्या रकमेपैकी 30 सप्टेंबर 2022 अखेर किमान 25 टक्के आणि 31 मार्च 2023 अखेर किमान 50 टक्के अनिष्ट तफावतीतील रक्कम कमी करण्याचे संस्थेवर बंधनकारक राहील.

या बाबी बंधनकारक

31 मार्च 2022 अखेरीस असलेल्या अनिष्ट तफावतीच्या रकमेत यापुढे वाढ होणार नाही, याची दक्षता घेवून कामकाज करावे व बँकेने सुचित केल्यानुसार कर्जखाती व्यवहार करावे. अनिष्ट तफावतीतील पात्र सभासदांनाच पीक कर्ज वितरण करावे. संस्था चालू हंगामात जेवढी रक्कम सभासदास पीक कर्ज वाटप करील अशा सर्व सभासदांची संस्था पातळीवर 100 टक्के कर्ज वसुली मुदतीत करुन शाखेत रोखीने भरणे संस्थेवर बंधनकारक राहणार आहे. तसेच थकबाकीदार सभासदांकडील पीक कर्जाची प्राधान्याने कर्ज वसुली करुन या सभासदांना देखिल नव्याने कर्ज वितरण करावे यासह सर्व सूचनांचे पालन करणे सोसायट्यांना बंधनकारक असणार आहे

बातम्या आणखी आहेत...