आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्रात 44% गरीब विद्यार्थी ‘स्मार्ट’ शिक्षणापासून वंचित; 76.3% विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन, केरळात हे प्रमाण सर्वाधिक 94%

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी फक्त 47% पालकांकडे स्मार्टफाेन

शालेय शिक्षणाच्या दर्जाची पडताळणी करणारा “असर’ अहवाल प्रकाशित झाला असून राज्यातील ७६.३ % विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन असल्याचे या पाहणीत पुढे आले आहे. अल्पशिक्षित पालकांपैकी ७४% विद्यार्थी शासकीय शाळांमध्ये जात असून त्यांच्यापैकी फक्त ५६ % पालकांकडे स्मार्टफोन असल्याचे यात पुढे आले आहे. राष्ट्रीय पातळीवर केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे ९४% पालकांकडे स्मार्टफोन असल्याचे तर पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी म्हणजे ४७% पालकांकडे स्मार्टफोन असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.

दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्तराची पडताळणी करणाऱ्या “असर’ सर्वेक्षणाची पद्धतही यंदा कोविडमुळे बदलण्यात आली होती. यामध्ये २६ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशातील ५२ हजार २२७ कुटुंबांतील पाच ते सोळा वयोगटातील ५९ हजार २५१ विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली. ऑनलाइन शिक्षणात सहायक भूमिका बजावणाऱ्या पालकांचे शिक्षण आणि यात महत्त्वाचे साधन ठरलेले पालकांकडील स्मार्टफोन याची उपलब्धता हा या सर्वेक्षणातील महत्त्वाचा निकष होता. त्यानुसार देशात केरळमधील सर्वाधिक म्हणजे ९४% पालकांकडे स्मार्टफोन आहेत, तर पश्चिम बंगालमधील फक्त ४७% पालकांकडे स्मार्टफोन असल्याचे यातून निदर्शनास आले आहे.

सर्वेक्षणाची व्याप्ती
{ २६ राज्ये { ०४ केंद्रशासित प्रदेश { ५२ हजार २२७ कुटुंब { ५९ हजार २५१ विद्यार्थी { सर्व विद्यार्थी ५ ते १६ वयोगटातील.

विविध निकष
- महाराष्ट्रातील अल्पशिक्षित पालकांची ७४% मुले शासकीय शाळेत जात असून त्यांच्यापैकी फक्त ५६% पालकांकडेच स्मार्टफोन आहेत.
- दहावीपर्यंत शिकलेल्या पालकांपैकी ६६% कुटुंबांतील विद्यार्थी शासकीय शाळेत जात असून त्यांच्यापैकी ७२% कुटुंबांमध्ये स्मार्टफोन आहेत.
- सर्वेक्षणात सहभागी ४६%पालकांचे दहावीच्या पुढे शिक्षण झाले असून त्यापैकी ६०% विद्यार्थी शासकीय शाळेत जातात. त्यापैकी ८३% पालकांकडे स्मार्टफोन आहेत.
- संपूर्ण राज्यात स्मार्टफोन असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे प्रमाण ७६.३% असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.