आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:45 राेटरी सदस्यांचा कलाविष्कार; अंतिम 15 स्पर्धकांतून विजेता जाहीर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या राेटरी क्लबच्या सदस्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राेटरी क्लबच्या वतीने पहिल्यांदाच ‘राेटरी आयडाॅल’ स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. रविवारी (दि.४) स्पर्धेच्या झालेल्या अंतिम फेरीत १५ स्पर्धंकामधून राेटरी क्लब आॅफ सिन्नरचे अजय बाहेती हे पहिले राेटरी आयडाॅल ठरले. स्पर्धेत ४५ राेटरीयन सहभागी झाले. सुमधुर आवाजातील सरस गाणी, उत्कृष्ट संभाषण असा कलाविष्कार स्पर्धेचा आकर्षण ठरला.

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिक राेटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सदस्यांनाही प्राेत्साहन मिळावे तसेच राेटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या कार्यरत सदस्यांची आेळख व्हावी, राेटरीच्या उपक्रमाचा प्रचार व प्रचार व्हावा या उद्देशाने पहिल्यांदाच राेटरी आयडाॅल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. १५ अंतिम स्पर्धकांची ग्रँड फिनाले रविवारी दि ४ शहरातील इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हाॅल येथे पार पडला.

विशेष म्हणजे या अंतिम फेरीसाठी नाशिकसह जळगाव, अकाेला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, चाेपडासह विविध ठिकाणांहून राेटरीयन सहभागी झाले हाेते. स्पर्धेच्या माध्यमातून राेटरी क्लबच्या सदस्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत बाहेती हे विजयी झाले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना राेख पारिताेषिक,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास राेटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर डाॅ. आनंद झुनझुनवाला, क्लबचे माजी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, राेटरी क्लब आॅफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल्ल बराडीया, सचिव आेमप्रकाश रावत यांच्यासह कमिटी मेंबर, राेटरी क्लबचे सदस्य या कार्यक्रमास उपस्थित हाेते.

६ स्पर्धकांतून निवड
राेटरी क्लबच्या वतीने आयाेजित या स्पर्धेसाठी ४५ सदस्यांनी नांेदणी केली हाेती. प्रारंभी आॅनलाइनच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांचे व्हिडीआे मागविण्यात आले हाेते. त्यात १५ स्पर्धकांची अंतिम निवड करण्यात आली हाेती. अंतिम फेरीत ६ स्पर्धकांतून बाहेती यांची निवड झाली.

हे ठरले विजेते
विजेती- अजय बाहेती, राेटरी क्लब सिन्नर, { पहिले उपविजेते-डाॅ. राजेश पाटील, राेटरी क्लब जळगाव वेस्ट
दुसरे उपविजेते-श्रीकांत मानकर, अमरावती,
उत्तेजनार्थ - शिवकुमार डागा,राेटरी क्लब खामगाव, डाॅ. अमित प्रेमचंद्र, राेटरी क्लब भद्रावती

बातम्या आणखी आहेत...