आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता यादी:अकरावीचे दोन दिवसांत 4883 प्रवेश; पहिली गुणवत्ता यादी जाहीर

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शहरातील सर्वच ६३ महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. दोन दिवसांत शहरातील विविध महाविद्यालयांत ४८८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. निवड झालेल्या १२ हजार ६२३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवार (दि. ६ आॅगस्ट) अंतिम मुदत आहे. ३ हजार विद्यार्थ्यांचे कॅप राउंडद्वारे प्रवेश झाले आहे. कोटा अंतर्गत एक हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहे.

यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्रमाची शाखा व महाविद्यालय मिळाले आहेत. शहरात २६ हजार जागा उपलब्ध असून पहिल्या यादीत १६ हजार ९५९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ६२३ विद्यार्थ्यांची निवड झाली. यात कला २०८१ तर वाणिज्य ४२१८ तर विज्ञान शाखेच्या ६१७७ विद्यार्थ्यांची निवड झाली. पहिल्या यादीत सर्वाधिक ९१२३ विद्यार्थ्यांना शाखा व प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले.

बातम्या आणखी आहेत...