आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:एलएल.बी.ची सलग 5 दिवस परीक्षा; एक दिवस तरी सुटी द्या, विद्यार्थ्यांची मागणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी. ए. एलएल.बी. (५ वर्षे) आणि एलएल.बी. (३ वर्षे) अभ्यासक्रमांची हिवाळी सत्र परीक्षा ३१ डिसेंबरपासून सुरू हाेणार आहे. या परीक्षेत पहिला पेपर झाल्यानंतर रविवारची एक सुटी सोडली तर पुढील ५ पेपर सलग होणार आहे. तसे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

कोरोना संपल्यानंतर अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या तयारीची मानसिकता योग्य प्रकारे झाली नसल्याने या पुढील ५ पेपरमध्ये एक तरी सुटी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) च्या नाशिक शहर काैन्सिलतर्फे पुणे विद्यापीठाच्या विभागीय केंद्राचे समन्वयक डाॅ. प्रशांत टोपे-पाटील यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

एलएल.बी. परीक्षा अशी होणार
३१ डिसेंबरला पहिला पेपर आहे. त्यानंतर १ जानेवारीला रविवार आल्याने सुटी आहे. पण २ जानेवारीपासून पुढील ६ जानेवारीपर्यंत सलग पेपर होतील. त्यात कुठेही सुटी नाही.

विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा
तीन तासांचा लेखी पेपर दिल्यानंतर शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकलेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशीच्या पेपरची तयारी त्वरित करणे शक्य होत नसल्याने पाच पेपरमध्ये एका दिवसाची सुटी द्यावी. - तल्हा शेख, राज्य काैन्सिल सदस्य, एआयएसएफ

बातम्या आणखी आहेत...