आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 5 Lakh Not Stolen From Currency Note Press, Accidental Punching Of Bundle !; Punching By Supervisor Done Under Work Stress; News And Live Updates

करन्सी नोट चोरी प्रकरण:करन्सी नोट प्रेसमधून ५ लाख चोरीस गेलेच नाहीत, बंडलाचे चुकून पंचिंग!; कामाच्या ताणात केले सुपरवायझरने पंचिंग

नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी गतीने अचूक तपास करून सत्य बाहेर आले

करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपये चोरी झाले नाही, तर कामाच्या अतितणावामुळे सुपरवायझरकडून बंडल पंचिंग झाले. कारवाईच्या धाकाने त्याने ही बाब लपवून ठेवल्याने देशभरात करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांची चोरी झाल्याची चर्चा पसरली गेली. परवानगीशिवाय जेथे चिटपाखरूही जाऊ शकत नाही, तेथे चोरी कशी झाली, यावर खल झाल्यानंतर उपनगर पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांनी गतीने अचूक तपास करून सत्य बाहेर आले. सपोनि सतीश खडके यांनी सांगितले की, करन्सी नोट प्रेसमधील ५ टीएचच्या मिलियनमधील १६४ नंबरचे बंडल चोरी झाल्याची तक्रार १३ जुलै रोजी मिळाली.

या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी केली असता चोरी गेलेल्या नोटांचे बंडल १२ फेब्रुवारीला एक्झामिनरकडून तपासून गेल्याचे समोर आले. या विभागात प्रत्येक कामगाराची नग्न तपासणी केली जाते. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. तेथे सुपरवायझरच्या परवानगी शिवाय नोटांचे बंडल हलवले जात नाही. म्हणून पोलिसांनी सुपरवायझरवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांचे रेकाॅर्ड तपासण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ‘कट पॅक’च्या दोन सुपरवायझरवर संशय होता.

पोलिस आपल्यापर्यंत पोहचल्याचे कळताच सुपरवायझरने २४ जुलै रोजी प्रेस प्रशासनासमोर सत्य परिस्थिती कथन केली. १६४ नंबरचे नोटांचे बंडल कामाच्या तणावात पंचिंग झाले. कारवाईच्या भीतीने ही बाब लपवली गेली. प्रेस व्यवस्थापनाने सुपरवायझर यांना निलंबनाची कारवाई केली आहे. काही नोटा चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाल्यास किंवा कंटीग चुकीचे झाली तर त्या डिफाॅल्टमध्ये टाकल्या जातात. या डिफाॅल्ट नोटांचे एक बंडल तयार करून त्यांना छिद्रे पाडून ते बंडल नष्ट केले जाते. याला नोटा पंचिंग करणे म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...