आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात यंदा तब्बल ५ लाख १ हजार ९८० विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याने त्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. विद्यापीठाचे उद्दिष्ट साध्य केल्याने प्रवेशाची प्रक्रिया पूर्णपणे थांबविली आहे. आॅनलाइन लिंक बंद करण्यासह आॅफलाइनचीही सुविधा आता बंद केल्याने आता नव्याने कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रकाश देखमुख यांनी स्पष्ट केले आहे.
पदवी, पदव्युत्तरसह डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे मिळून ४ लाख ९२ हजार ५२५ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर प्रवेशासाठी अर्ज केले होते. पैकी ४ लाख ८१ हजार ७६० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेश निश्चित केले. २१ हजार २४७ विद्यार्थ्यांची पात्रता अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय बी.एड. साठी १४९१, बीएड (स्पेशल एज्युकेशन ) १०८ आणि कृषी उपक्रमासाठी १८ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.